मुंबईः सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ७३ कोटी ६२ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. या मालमत्तेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे विश्वासू प्रवीण राऊत आणि त्याच्या जवळच्या साथीदारांच्या पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे परिसरातील जमिनींचा समावेश आहे.

म्हाडाच्या तक्रारीवरून २०१८ मध्ये एचडीआयएलशी संबंधित गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे तत्कालीन संचालक राकेश वाधवान, सारंग वाधवान व इतर आरोपींविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या कंपनीने २००६ मध्ये पत्राचाळीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता. परंतु दिलेल्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. विकसकाने ६७२ रहिवाशांना वाऱ्यावर सोडून म्हाडासाठीचे अतिरिक्त गाळेही दिले नाहीत. या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचे २०११ मध्ये उघड होताच म्हाडाने त्यावर कारवाई सुरू केली. म्हाडाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी भादंवि कलम १२० (ब), ४०९, ४२० अंतर्गत मार्च २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांच्या आधारावर ईडी तपास करीत आहे.

terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
kalyan Dombivli municipal corporation
डोंबिवलीतील कोपरमध्ये स्थगिती आदेश देऊनही बेकायदा बांधकामाची उभारणी सुरूच; शासन, कडोंमपाचे आदेश बांधकामधारकांकडून दुर्लक्षित
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
My Portfolio Phoenix Mills Ltd
माझा पोर्टफोलियो : फिनिक्स मिल्स लिमिटेड
In yavatmal front of collectors office Shetkari Warkari Sangathan protested today while celebrated Black Diwali
यवतमाळ : काळी दिवाळी अन शिदोरी…, काय आहे नेमके प्रकरण जाणून घ्या
senior citizen cheated, Varad Properties,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
fraud with the lure, virtual currency, Hadapsar police,
पुणे : आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने दोन कोटींची फसवणूक, हडपसर पोलिसांकडून सहाजणांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा…गर्भावस्थेतील बाळात दोष आढल्याने गर्भपातास परवानगी

आर्थिक गुन्हे शाखेतील प्रकरणाच्या आधारवर ईडीने तपासाला सुरूवात केली. ईडीने गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढला असता एचडीआयएलकडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे १०० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्याबाबत आणखी माहिती घेतली असता ही रक्कम पुढे प्रवीण राऊत याने त्याच्या जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्याच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केली. त्यानंतर हा तपास शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी व त्यानंतर संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचला होता.