महाबळेश्वर नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज पालिका मुख्याधिकारी सचिन पवार यांच्याकडे दाखल झाले आहेत. महाबळेश्वर नगराध्यक्ष निवडीसाठी आज मुदत संपली तोपर्यंत नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी लोकमित्र जनसेवा आघाडी तर्फे सुनीता संदीप आखाडे यांचा अर्ज मुख्याधिकारी सचिन पवार यांच्याकडे आला.  यावेळी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, नगरसेवक लक्षमण कोंडाळकर,  संतोष आबा शिंदे, अफझल सुतार, नगरसेविका अपर्णा सलागरे, विमल ओंबळे, अतुल सलागरे, संदीप आखाडे, मधुकर चव्हाण आदी उपस्थित होते, तर आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत आघाडीच्या विरोधी गटाच्या वतीने उज्वला रतिकांत तोष्णीवाल यांचा अर्ज भरण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, नगरसेवक संदीप साळुंखे, कुमार िशदे, डॉ. नंदकुमार भांगडिया, नगरसेविका विमलताई पार्टे, संगीता वाडकर, सुरेखा आखाडे, लीला मानकुंबरे, दतात्रय वाडकर, रतिकांत तोष्णीवाल, निवसभाऊ शिंदे, विशाल तोष्णीवाल, संतोष पार्टे आदी उपस्थित होते. यावेळी पालिका मुख्य लिपीक  संजय दीक्षित, मुख्याधिकारी यांच्या मदतीसाठी उपस्थित होते .
 दरम्यान १७ लोकनियुक्त व २ शासन नियुक्त  अशा १९ नगरसेवक असलेल्या पालिकेत सत्ताधारी लोकमित्र जनसेवा आघाडीकडे आठ व विरोधी गटाकडे आठ असे १६ व एक अपक्ष नगरसेवक असे १७ जण आहेत. अर्ज मागे घेणे १२ जुलैपर्यंत असून निवडणूक व निकाल १४ जुलै रोजी आहे. सध्या लोकमित्र आघाडीकडे सत्ता असून २.५ वर्षे डी. एम. बावळेकर हेच नगराध्यक्ष होते. उर्वरित २.५ वर्षे  महिला खुल्या प्रवर्गासाठी असल्याने १४ जुलै रोजी कोण बाजी मारतो याकडे सा-या शहराचे लक्ष लागून राहिले आहे. १४ जुलै रोजीच नगराध्यक्ष निवडीनंतर उपनगराध्यक्षांची निवडणूक होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two applications to the chief for selection of mahabaleshwar mayor
First published on: 10-07-2014 at 03:00 IST