सांगली : वाळवा तालुययात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास करणाऱ्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गोटखिंडी येथे अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी गुरूवारी दिली. त्यांच्याकडून तीन घटनातील अडीच तोळे वजनाचे दीड लाखाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.

हेही वाचा >>> Raisins In Sangli : नवीन बेदाण्यासाठी किलोला १६१ रुपयांचा दर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोटखिंडी येथे दोन तरूण सोने विक्री करण्यास येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने पाळत ठेवून परमेश्‍वर काळेबाग (वय ३९, रा. आळसंद ता. पंढरपूर) आणि बाजीराव नरळे (वय ४०, रा. परीयंती, ता.माण सध्या वास्तव्य आळसंद) यांना ताब्यात घेउन चौकशी केली असता चोरीचा छडा लागला. त्यांनी दुचाकीवरून जाउन येलूर, रेठरे हरणाक्ष व शिरगाव या ठिकाणी रस्त्यावर थांबलेल्या महिलांचे गळ्यातील दागिने हिसडा मारून लंपास करत पोबारा केला होता अशी कबुली दिली. त्यांच्याकडून दोन दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या आहेत.