लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
अलिबाग : खालापूर येथे रिझवी महाविद्यालयाची चार जणे बुडाल्याची घटना ताजी असतांनाच, अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. अथर्व शंकर हाके आणि शुभव विजय बाला अशी दोघांची नावे आहेत.
सोगाव जवळील मुनवली तलावात दुपारी दोन वाजताच्या सुमारास पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचाही शोध सुरू केला. मात्र तोवर दोघांचाही मृत्यू झाला होता. दोघांचेही मृतदेह अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
आणखी वाचा-“NEET परीक्षा रद्द होण्यामागे केंद्र सरकारचा हलगर्जीपणा, आम्ही आता..,” सुप्रिया सुळेंचा इशारा
दोन दिवसांपुर्वीच खालापूर तालुक्यातील एका धरणात वर्षासहलीसाठी आलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. आता अलिबाग तालुक्यातल पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे.