सांगली : वैयक्तिक कारणातून मिरज तालुक्यात खूनाच्या दोन वेगवेगळ्या घटना सोमवारी रात्री घडल्या. दोन्ही घटनामधील संशयितांनाा पोलीसांनी अटक केली असून सततच्या खून सत्रामुळे पोलीस यंत्रणा मात्र हबकली आहे.

मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील बेडग येथे रामचंद्र शंकर खरात (वय ४२) आणि पश्‍चिम भागातील कसबे डिग्रज येथे पांडूरंग कुंभार याचा खून सोमवारी रात्री झाला. बेडग येथील खूनाचा प्रकार जमिनीच्या वादातून आणि पोलीस ठाण्यात तक्रार का दाखल केली या कारणातून झाला असल्याची माहिती मिळाली. मृत खरात याचा चुलत भाऊ संचिन खरात याने कुर्‍हाडीने वार करून सोमवारी रात्री खरात वस्तीवरील घरासमोर खून केला. खूनानंतर तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्यानेच पोलीसांना खून केल्याचे सांगितले. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-पुणे- नाशिक महामार्गावरील ‘सरकार’ लॉजवर सुरू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी टाकला छापा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर कसबे डिग्रज येथे उसनवारीच्या पैशावरून झालेल्या वादात श्रीधर जाधव यांने पांडूरंग कुंभार याच्यावर चाकूने वार केले. यात जाधव याचा जागीच मृत्यू झाला. मृत कुंभार हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होता. दोन हजार रूपये उसने दिले नाहीत म्हणून चिडून जाऊन हा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित जाधव याला पोलीसांनी अटक केली आहे.