गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील खोबरामेंडा गावाजवळच्या देवगड पहाडीत मंगळवारी पहाटे पाच वाजता पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २ नक्षलवादी ठार झाले. सी ६० पथकाला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली आणि त्यामध्ये २ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात या पथकाला यश आले. पोलिसांनी दोन्ही नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत, परंतु त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. या दोघांकडून १ ‘एसएलआर’ आणि १ ‘थ्रीझिरोथ्री’ अशा दोन बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. या बंदुकांचा वापर गटातील मोठ्या नेत्यांकडून केला जातो. त्यामुळे हे दोघेही मोठे नक्षलवादी नेते असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Aug 2014 रोजी प्रकाशित
गडचिरोलीत चकमकीत २ नक्षलवादी ठार
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील खोबरामेंडा गावाजवळच्या देवगड पहाडीत मंगळवारी पहाटे पाच वाजता पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २ नक्षलवादी ठार झाले.
First published on: 12-08-2014 at 10:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two naxalite killed in gadchiroli