सांगली : कुपवाडमधील खासगी शाळेत चौथ्या मजल्यावरून उडी मारून अकरावीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडल्यानंतर त्याच शाळेत अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाने बुधवारी सकाळी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला. दोघांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.

हेही वाचा >>> सांगली : अल्पवयीन तीन मुलींवर लॉजमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार; चौघांना अटक

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
Dissatisfaction among students over delay in Maharashtra Public Service Commission exams results interviews
‘एमपीएससी’च्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच; अनेक परीक्षांचे अभ्यासक्रम प्रलंबित, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव

याबाबत माहिती अशी – साक्षी रवींद्र जाधव (वय १७, रा. मिरज) या मुलीने शाळेच्या चौथ्या माळयावरून उडी मारण्याचा प्रकार मंगळवारी शाळा सुटल्यानंतर घडला. या वेळी तिचे पालकही शाळेत आले होते. उडी मारल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने पालकांच्या मदतीने तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. याबाबत कुपवाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली. 

या घटनेबाबत ठाणा प्रभारी सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांनी सांगितले, की मुलगी शाळा सुटल्यानंतर दप्तर घेऊन बसमध्ये गेली होती. त्याच दरम्यान, तिचे पालक तिच्यासंबंधी शिक्षकांना विचारणा करण्यासाठी शाळेच्या आवारात आले होते. या दरम्यान, तिने बसमधून परत शाळेच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. दरम्यान, या घटनेला २४ तास उलटण्यापूर्वीच प्रथमेश हणमंत पाटील (रा. सुभाषनगर, मिरज) या मुलाने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हा मुलगाही याच शाळेत अकरावी विज्ञान विभागात शिक्षण घेत होता.