नांदेड जिल्ह्यात मुदखेड जवळील सिता नदीला आलेल्या पुरात दुचाकीसह दोन जण वाहून गेले. ही घटना मंगळवारी (१२ जुलै) रात्री उशिरा घडली. वाहून गेलेल्या दोघांपैकी एकजण रात्रीच पुराच्या बाहेर पडला, तर एकाला संपूर्ण रात्र झाडावर काढावी लागली. अखेर पहाटे एसडीआरएफच्या टीमने मदत अभियान राबवत अडकलेल्या तरुणाला सुखरुप बाहेर काढले.

सावळा शिंदे आणि पिराजी शिंदे हे विहीर खोदण्याचे काम करण्यासाठी बारड येथून मुदखेडला गेले होते. दोघेही रात्री दुचाकीवरून घराकडे परतत होते. त्याचवेळी ते आपल्या दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. पिराजी शिंदे हा कसाबसा पुराच्या पाण्यातून बाहेर आला. मात्र, सावळा शिंदे पुराच्या पाण्यात वाहून गेला. पाण्यात वाहत असताना सावळा शिंदेने एका झाडाचा आधार घेतला आणि रात्र झाडावर काढली.

हेही वाचा : उल्हास नदी धोक्याच्या पातळीवर, बदलापुरकरांना सतर्कतेच्या सूचना, ३०० हून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर पहाटे एसडीआरएफच्या पथकाने बचाव अभियान राबवत सावळाला सुखरुप बाहेर काढले. सितानदीला आलेल्या पुरामुळे नांदेड-मुदखेड रस्ता मंगळवारपासून वाहतुकीसाठी बंद आहे, अशी माहिती तलाठी व्ही. एस. गलांडे यांनी दिली.