अलिबाग – रायगड जिल्‍हयातील चार घरफोडयांचा छडा लावण्‍यात स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखेला यश आले आहे. या प्रकरणी दोघांची मध्‍यप्रदेशात जावून गठडी वळली आहे. त्‍यांनी चार गुन्‍हयांची कबुली दिली असून त्‍यांच्‍याकडून ५ लाख ५७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्‍तगत करण्‍यात आला आहे.

रेवसिंग सुरसिंग भुरिया आणि दिनेश दुलसिंग मिनवा अशी आरोपींची नावे आहेत. ते मुळचे मध्‍यप्रदेशातील धार जिल्‍हयातील रहिवासी आहेत. त्‍यांनी पोयनाड, अलिबाग आणि नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत चार घरफोडया केल्‍याचे कबुल केले आहे. त्‍यांच्‍याकडून घरफोडी करून लुटलेला साडेपाच लाखांचा मुददेमाल हस्‍तगत करण्‍यात आला आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचया आदेशानुसार स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचया मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरे, सरगर, हेड कॉन्‍स्‍टेबल अमोल हंबीर, प्रतीक सावंत, रवींद्र मुंडे, जितेंद्र चव्‍हाण, अक्षय पाटील, सचिन वावेकर, राकेश म्‍हात्रे,कॉन्‍स्‍टेबल राकेश लांबोटे यांनी या कारवाईत भाग घेतला. तपास कामात सायबर सेल धार राज्य मध्य प्रदेशचे प्रभारी प्रशांत गुंजाळ व पोलीस कॉन्स्टेबल  भानुप्रतापसिंग राजपूत यांनी मोलाचे सहकार्य केले.