उद्योगमंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर ठेवलेल्या डीपीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. किरण सामंत यांनी डीपीला ठाकरे गटाची निशाणी मशाल चिन्ह ठेवलं आहे. पण, चर्चा सुरू होताच सामंत यांनी मशालीचा डीपी बदलला आहे. यावर किरण सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

किरण सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. पण, किरण सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या पेटती मशाल निशाणीचा डीपी व्हॉट्सअ‍ॅपवर लावला होता. तसेच, ‘जो होगा, देखा जायेगा’ असं स्टेटसवर लिहिलं होतं.

हेही वाचा : “…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

याबद्दल ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना किरण सामंत म्हणाले, “मी डीपी ठेवला होता. याला काही कारणं होती. त्यावर योग्यवेळी बोलेन. फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे पाहून डीपी मागे घेतला.”

हेही वाचा : “सोसायटीचं नाव सांगा, त्यांना धडा शिकवू”, पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर मनसे नेत्याची आक्रमक प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जो भी होगा देखा जायेगा’ असं स्टेटस लिहिण्याबाबत प्रश्न विचारल्यावर किरण सामंत यांनी म्हटलं, “शंभर टक्के सर्व गोष्टीला आपली तयारी होती. फक्त उदय सामंत यांच्या राजकीय करिअरमुळे स्टेटस मागे घेतलं. माझ्यामुळे उदय सामंत यांचं राजकीय करिअर खराब होऊ नये.”