वेदान्त-फॉक्सकॉन यांनी आपला प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी आज केंद्र सरकारतर्फे ४३ देशातील उद्योपतींची गोलमेज परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतर उद्योगमंत्री उदय सांमत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वेदान्तचा एक प्रकल्प गेला म्हणजे, सगळचं गेलं असं होत नाही, त्याऐवजी दुसरी गुंतवणूक आम्ही राज्यात आणण्याचा प्रयत्न करतो आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “…म्हणून बंडखोरांना थांबवण्यात अर्थ नव्हता”, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

नेमकं काय म्हणाले उदय सामंत?

“आज केंद्र सरकारतर्फे ४३ देशातील उद्योपतींची गोलमेज परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रात गुंतवणूक व्हावी, नवे उद्योजक तयार व्हावे, या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. राज्यातून वेदान्तचा एक प्रकल्प गेला म्हणजे, सगळचं गेलं असं होत नाही, त्याऐवजी राज्यात दुसरा मोठा प्रकल्प व्हावा, मोठी गुंतवणूक व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. वेदान्तचा प्रकल्प हा तेव्हाच्या सरकारच्या दुर्लक्षामुळे गेला होता”, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुनील राऊतांची शिंदे गटावर सडकून टीका; म्हणाले, “शिंदे गटाविरोधात…”

दरम्यान, यावेळी त्यांनी कोकणातल्या रिफानरीला होणाऱ्या विरोधावरही प्रतिक्रिया दिली. “रिफानरीच्या जागेपैकी २९०० एकर जागेचं संमतीपत्र एमआयडीसीला मिळालं आहे. यासाठी एकूण ६ हजार एकर जागेची आवश्यकता आहे. मात्र, ज्या गावात रिफानरीचा संबंध नाही, त्या गावातही आंदोलनं करण्यात येत आहेत. खरं तर यात त्या आंदोलनकांचा दोष नाही. त्याठिकाणी राजकारण होत असल्याचे दिसून येत आहे. आमदार रिफायनरीचे समर्थन करतात तर खासदार विरोध करत आहेत. याबाबत एक निश्चित भूमिका असणे आवश्यक आहे. त्यामुळे वेदान्त गेला म्हणून ओरडण्यापेक्षा रिफायनरी हवी की नको, याचं उत्तर त्यांनी द्यावं”, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant reaction on vendant project after mumbai businessman roundtable conference spb
First published on: 10-10-2022 at 19:00 IST