वाई: साताऱ्यात उदयनराजे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन करत जंगी स्वागत करण्यात आले. साताऱ्याची भाजपाची उमेदवारी मला मिळाली आहे. कोणत्याही परिस्थितीत मी निवडणूक लढविणार आहे. वरिष्ठ पातळीवर सर्व निश्चित झाले आहे .मला कोणीही ताटकळत ठेवलं नाही. देशाची निवडणूक आहे त्यामुळे प्रक्रियेला वेळ तर लागणारच. आघाडीच्या चर्चेचा विषय असल्याने उमेदवारी जाहीर करणे थोडे लांबणीवर पडत आहे. काहीही झाले तरी मी निवडणूक लढविणार आहे असे खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात शिरवळ येथे सांगितले .

दिल्लीतील मुक्काम  संपवून साताऱ्यात आलेल्या खासदार उदयनराजे यांचे आज जंगी स्वागत करण्यात आले. साताऱ्याच्या सीमेवर निरा  नदी ओलांडून येताच त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन  केले. जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर जोरदार  पुष्पवृष्टी करण्यात आली. क्रेनच्या माध्यमातून काही टन वजनाचे हार त्यांना घालण्यात आले. उदयनराजे साताऱ्यात प्रवेश करतेवेळी महामार्गाला जत्रेचे स्वरूप आले होते. मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक या ठिकाणी उपस्थित होते. ढोल ताशे छत्र चामरे अशा राजेशाही थाटात त्यांचे स्वागत करण्यात आले.  शिरवळ पासून  सातारा पर्यंत त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली आहे.

nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Shivsena Thane, BJP alliance candidate Thane,
अन् महायुतीचा मुहूर्त चुकला, ठाण्यातील स्वागत यात्रेत यंदा शिवसेना भाजप युती उमेदवाराविनाच

हेही वाचा >>>सांगली: मुलींचे फोटो गाठोड्यात बांधून स्मशानभूमीत करणीचा अघोरी प्रकार

साताऱ्याची लोकसभेची जागा महायुतीने अद्यापही जाहीर केलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उदयनराजे यांनी घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवावी असे सांगितलेले आहे. मात्र उदयनराजे हे कमळ या चिन्हावरच निवडणूक  लढविण्यावर ठाम आहेत. आजच्या मिरवणुकीत कमळ चिन्ह असलेला रथ सामील करण्यात आला होता.

यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले,मी निवडणूक  लढविणारच आहे. माझी साताऱ्यात लोकसभेची तयारी सुरू होती. माझे दौरे सुरू होते .परंतु काही कारणास्तव मला दिल्लीला जावे लागले .तेथे गेल्यानंतर मला तिथे कोणीही मला ताटकळत ठेवलेले नाही. ही देशाची निवडणूक आहे. त्यामुळे वरिष्ठांची चर्चेला वेळ तर लागणारच.  जिथे पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तेथील लोकांशी अगोदर चर्चा करणे गरजेचे असते आणि लोकसभेची निवडणूक ही मोठी प्रक्रिया असते. त्यामुळे मला तिथे कोणी ताटकळ ठेवलेले  हे सगळं खोटं आहे. माझे वरिष्ठांशी बोलणे झालेले आहे. माझी उमेदवारी निश्चित आहे. मला भाजपातील सहकार्य करणारी सर्व  मित्रमंडळी,  राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर घटक पक्ष या सर्वांशी चर्चा झालेली आहे. पक्षश्रेष्ठींनी मला निवडणूक लढविण्यास सांगितलेले आहे.  मी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आलो आहे हीच माझी उमेदवारी आहे.त्यामुळे शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही, असेही उदयनराजे म्हणाले.

हेही वाचा >>>भाजपाकडून नवनीत राणांना अमरावतीतून लोकसभेची उमेदवारी; आनंदराव अडसूळ, बच्चू कडू काय भूमिका घेणार?

माझ्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने सातारकर या ठिकाणी उपस्थित राहिले. यामुळे मी भारावून गेलो आहे. कालही मी जनतेचा होतो आजही आहे आणि भविष्यकाळातही जनतेचा राहणार आहे.   यानंतर त्यांची सातारा शहरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. सातारा शहरातही त्यांचे मोठे स्वागत झाले. रस्त्यावर  दुतर्फा उभे राहून नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.  राजपथावर नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी  केली. सातारा शहरातील पोवई नाक्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.