कराड : खरं काय, खोटं काय, मला माहिती नाही. पण, पोलीस आणि शासकीय यंत्रणांनी फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करावा. तसेच यात जो कोणी दोषी असेल, त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली. दरम्यान, सत्य उघड होईपर्यंत कुणीही कुणावर राजकीय आरोप करणेही चुकीचे असल्याचे मत उदयनराजे यांनी व्यक्त केले. दरम्यान सातारा तालुक्यातील सासपडे येथील बालिका हत्याप्रकरणी बोलताना, उदयनराजे म्हणाले, की अल्पवयीन मुलीच्या अमानुष हत्येच्या गुन्ह्यातील दोषींविरुद्ध कडक कारवाई आवश्यक असून, संबंधितांना न्यायाच्या चौकटीत आणले पाहिजे. फलटण शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या बहुचर्चित आत्महत्याप्रकरणी खासदार उदयनराजे बोलत होते. ते म्हणाले, की हा प्रकार गंभीर आणि दुर्दैवी आहे.

या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही आपण चर्चा करणार आहोत. शासन आणि पोलीस यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही, याची आशा आहे. ज्यांच्याकडे काहीही माहिती असेल, त्यांनी ती तपास यंत्रणांना द्यावी. एक नागरिक म्हणून या प्रकरणात न्याय मिळवून देणे माझे कर्तव्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर विरोधकांकडून आरोप होत आहेत. यावर ते म्हणाले की, आरोप करणे सोपे आहे. परंतु, सत्य उघडकीस येईपर्यंत निष्कर्ष न काढता असे आरोप करणे चुकीचे आहे. तपास यंत्रणांना आपले काम करू दिले पाहिजे, असे मत उदयनराजे यांनी व्यक्त केले.

सातारा तालुक्यातील सासपडे येथील बालिका हत्याप्रकरणी बोलताना, उदयनराजे म्हणाले, की अल्पवयीन मुलीच्या अमानुष हत्येच्या गुन्ह्यातील दोषींविरुद्ध कडक कारवाई आवश्यक असून, संबंधितांना न्यायाच्या चौकटीत आणले पाहिजे. खरं काय, खोटं काय, मला माहिती नाही. पण, पोलीस आणि शासकीय यंत्रणांनी फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करावा. तसेच यात जो कोणी दोषी असेल, त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी उदयनराजे यांनी केली. दरम्यान, सत्य उघड होईपर्यंत कुणीही कुणावर राजकीय आरोप करणेही चुकीचे असल्याचे मत उदयनराजे यांनी व्यक्त केले.

उद्धव ठाकरे यांच्या मोदी- शहांविरुद्धच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले, की ते जे बोलतात ते जर लोकांचे मत असते तर, ते निवडणुकीत दिसले असते. परंतु, आरोप करताना, पुराव्यांचा आधार असावा. बोलायचं असेल तर पुराव्यांसह बोलावे, आपण एखाद्याचा हात पकडू शकत नाही, तसंच कोणाचं बोलणंही थांबवू शकत नाही,’ अशी टिप्पणी खासदार उदयनराजेंनी या वेळी केली.