Uddhav Thackeray ties Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीनंतर धक्कादायक निकास समोर आलेले आहेत. महायुती वगळता इतर कोणत्याही पक्षाला पुरेसे यश मिळालेले नाही. महाविकास आघाडीमधील तीनही घटक पक्षांचा दारूण पराभव झाला. तर मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसारख्या पक्षांना १०० हून अधिक जागा लढवूनही एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. मनसेची स्थापना झाल्यापासून प्रथमच विधानसभेत मनसेचा एकही आमदार नसणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे) पक्षाचीही मोठी पिछेहाट झाली आहे. उद्धव ठाकरेंनी ९५ जागांवर निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना केवळ २० जागा जिंकण्यात यश आले. तसेच आता मविआमधून आपण बाहेर पडले पाहीजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचे नेते करत आहेत. तर दुसरीकडे भाजपाला पाठिंबा देऊनही मनसेला यश मिळालेले नाही. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूसाठी आता एकत्र येण्याची योग्य वेळ असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट मत नोंदविले आहे.

हे वाचा >> अग्रलेख: ठाकरे + ठाकरे

Stone planting on leader anil deshmukh vehicle,
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक,राजकीय वर्तुळात खळबळ
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
What Revanth Reddy Said?
Revanth Reddy : “महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यास मुस्लिम आरक्षण…”, रेवंथ रेड्डी काय म्हणाले?
Aditi Tatkare
मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?
Sadanand Tharwal Dombivli BJP ravindra chavhan
डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचे भाजपला समर्थन, शिवसेनाप्रमुखांना अनावृत्तपत्र लिहून व्यक्त केल्या भावना
raj thackeray switzerland incident
“ए आजी तुला बोललो ना…”; राज ठाकरेंनी सांगितला स्वित्झर्लंडमधील भन्नाट किस्सा!
Badnera Assembly constituency, Bachchu Kadu, uddhav Thackeray group, navneet rana
राणांविरोधात बच्‍चू कडूंची ठाकरे गटाच्‍या बंडखोर उमेदवाराला साथ ; म्‍हणाले, “नेतेच आता खतरे मे…”

काय म्हणाले अंबादास दानवे?

ठाकरे ब्रँड पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत, यावर आपल्याला काय वाटते? असा प्रश्न दानवे यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “निवडणुकीत पराभव झाला की, अशा चर्चा सुरू होतात. मागच्या निवडणुकांवरही नजर टाकल्यास लक्षात येईल की, निकालानंतर काही दिवस अशी चर्चा रंगते. त्यानंतर ती चर्चा मागे पडते. पण एकत्र यायचे की नाही, याबद्दल ते दोन नेतेच ठरवू शकतात. त्यात आम्ही काहीच बोलू शकत नाही.”

राज ठाकरेंची भूमिका संदिग्ध

अंबादास दानवे पुढे म्हणाले, “राज ठाकरेंची भूमिका कुणालाच कळलेली नाही. ते सरकारच्या विरोधात होते की, सरकारच्या बाजूने होते? सरकारच्या बाजूने असतील तर त्यांच्याच विरोधात निवडणुकीला उभे राहिले आणि विरोधात असतील तर त्यांनीच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला. त्यामुळे जनतेनेही आपला निर्णय घेतला. यातून राज ठाकरेंनी योग्य तो धडा घ्यावा.”