कोल्हापूर : महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर कोणत्याही परिस्थितीत स्थिर ठेवणार, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी येथे दिले. विधानसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ठाकरे यांनी मंगळवारी आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आघाडीची एकजूट कायम ठेवण्याचा संदेश उमेदवारांसह कार्यकर्त्यांना दिला.

महिलांसाठी योजना

महायुतीच्या काळात गंभीर बनलेल्या महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन, मोठ्या प्रमाणावर महिला पोलिसांची भरती आणि राज्यातील भूमीपुत्रांना हक्काची घरे देणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा…तुरुंगात जाईन, पण ‘लाडकी बहीण’ बंद पडू देणार नाही एकनाथ शिंदे

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार शाहू छत्रपती महाराज, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगांवकर, शिवसेना उपनेते संजय पवार, विजय देवणे यांच्यासह राहुल पी.एन. पाटील, ऋतुराज पाटील, नंदाताई बाभूळकर, के.पी. पाटील, समरजित घाटगे, गणपतराव पाटील, राजू आवळे, मदन कारंडे, सत्यजित पाटील सरुडकर तसेच आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.f