‘महादेव’ या ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपवरून छत्तीसगडमधील राजकारण तापलं आहे. ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपच्या प्रवर्तकांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत ५०८ कोटी रुपये दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी ( ३ नोव्हेंबर ) केला. तसेच हे प्रकरण चौकशीच्या कक्षेत येत असल्याचे सांगितले. यावरून बघेल यांना भाजपाकडून लक्ष्य करण्यात येत आहे. आता शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य करत भाजपावर हल्लाबोल केला आहे.

“‘महादेव’ बेटिंग अ‍ॅप प्रकरणावरून भूपेश बघेल भाजपात जाणार नाहीत. पण, बघेल भाजपात गेले, तर ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपचे ‘हर हर महादेव’ अ‍ॅप होईल. एवढं निर्लज्जपणाने चाललं असताना आपण गप्प कसं काय बसू शकतो?” असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

हेही वाचा :  “…अन् त्याला जबाबदार शरद पवार आहेत”, उद्धव ठाकरेंच्या विधानाने एकच हशा पिकला

“आता ‘ईडी’स कारभार चालला आहे”

“लोकशाहीचा चौथा स्तंभ सत्ताधाऱ्यांच्या वाळवीनं पोखरून टाकला आहे. अक्षरश: चौथ्या स्तंभाला वाळवी लागली आहे. आजपर्यंत ‘हिडी’स कारभार चालला आहे, असं म्हटलं जायचं. आता ‘ईडी’स कारभार चालला आहे. सरकारनं सर्वांशी समान वागावे. पण, हे क्लिनचिट देणारं सरकार आहे,” असं टीकास्र उद्धव ठाकरेंनी डागलं आहे.

हेही वाचा :  “घरी बसणाऱ्यांना जनतेनं घरी बसवलं”, मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शिवसेनाप्रमुखांचे फोटो चोरून आपले पक्ष चालवत आहेत”

“प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रवाहाबरोबर जाणं पसंत केलं नाही. त्यांनी सत्तेला प्रश्न विचारले. प्रबोधनकार परवडण्याजोगे करायचे असेल, तर त्यांच्यासारखं निस्वार्थी, निस्पृह आणि निर्भिड व्हावे लागेल. नाहीतर निर्ल्लज्याला निस्पृह होता येत नाही. काहीजण शिवसेनाप्रमुखांचे फोटो चोरून आपले पक्ष चालवत आहेत. ना विचार, ना नेता,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहे.