Uddhav Thackeray शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा मुंबईतील शिवतीर्थावर म्हणजेच दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी चौफेर टोलेबाजी करत भाजपा आणि एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. तसंच अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. अजित पवार हे २०१९ ला जे महाविकास आघाडी सरकार आलं त्यातही उपमुख्यमंत्री होते आणि त्यानंतर महायुतीच्या सरकारमध्येही ते जुलै २०२३ पासून उपमुख्यमंत्री आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत जो काही पराभव महायुतीचा झाला त्यानंतर अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील अशा चर्चा आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) त्यांचा उल्लेख करत अजित पवार बाहेर पडण्याचा दावा केला आहे.

उद्धव ठाकरे भाषणात काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, महाराष्ट्राची ओळख सांगणारी ही लढाई आहे. महाराष्ट्राचं जे वर्णन आहे. मंगल देशा पवित्र देशा राकट देशा कोमल देशा, फुलांच्या देशा… दळभद्र्यांच्या देशा नाही. बुद्धीच्या देशा. हे वर्णन कायम ठेवायचं आहे. लाचार आणि गद्दारांच्या देशा असं करायचं नाही. मी काही झालं तरी हा महाराष्ट्र भाजपच्या हाती जाऊ देणार नाही. फुले, आंबेडकर, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र मोदी शाह यांच्या हाती जाऊ देणार नाही. असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचप्रमाणे अजित पवार महायुतीत राहणार नाहीत या आशयाचं विधानही उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) केलं.

अजित पवारांबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे म्हणाले, आता असं कळलंय की ७० हजार कोटींचा घोटाळा करणारेही लाजून बाहेर पडणार आहेत. त्यांना पण लाज वाटू लागली आहे. असं ऐकलंय. यांचा घोटाळा मोठा आहे. माझा तर काहीच नाही असं त्यांना वाटतंय. असं मी ऐकलंय. अशी बातमी आहे. सगळं त्यांना लखलाभ असो जीवात जीव असे पर्यंत महाराष्ट्र लुटू देणार नाही. शेवटचा श्वास असेपर्यंत मी माझा महाराष्ट्र मोदी-शाह यांचा होऊ देणार नाही. शाहू, फुले आंबेडकरांचा आणि छत्रपतींचा महाराष्ट्र मोदींच्या हाती जाऊ देणार नाही अशीही गर्जना उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) केली.

हे पण वाचा- Uddhav Thackeray : “आनंद दिघे असते तर त्यांनी शिंदेला गोळीच घातली असती..”; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्यासमोरची लढाई म्हणजे महाभारत आहे

आपल्यासमोर असलेली ही लढाई म्हणजे महाभारत आहे, पांडव पाच होते आणि कौरव शंभर. शकुनीमामा कोण तुम्हाला माहीत आहे. सुईच्या अग्रवार मावेल इतकीही जागा तुम्हाला देणार नाही अशी मस्ती कौरवांची होती. भाजपाचीही आज हीच भूमिका आहे. सुईच्या अग्रवार जमीन मावणार नाही पण ती अग्र तुमच्या कुठे टोचेल? आता तर तलवारी आहेत माझ्या समोर आहे. ज्यांनी तुम्हाला संकट काळात साथ दिली, महाराष्ट्रात यांना (भाजपा) कुणी विचारत नव्हतं तेव्हा आम्ही भाजपाला खांद्यावर घेतलं. आज आम्हाला भाजपाला खांदा द्यायचा आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) लगावला.