मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेचे उघड दोन गट पडले आहेत. शिंदे गटाने भाजपासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाची एकनाथ शिंदे गटाविरोधात न्यायालयीन लढाई सुरू आहे. शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिंदे गटावर कठोर टीका करताना दिसत आहेत. आजदेखील (२२ ऑगस्ट) त्यांनी लाज, सज्जा सर्व सोडून दिली आहे, असे म्हणत बंडखोरांवर टीकेचे आसूड ओढले. ते मुंबईत समर्थकांना संबोधित करत होते.

हेही वाचा >> “आता निवडणुका होऊ शकत नाहीत” ओबीसी आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर देवेंद्र फडणवीसांचे विधान

“सध्या महाराष्ट्रच नव्हे तर देशातील सर्वसामान्यांच्या मनात चीड आहे. ज्या पद्धतीने ते आपल्याशी वागले आणि वागत आहेत ती हिंदुत्वाला साजेशी नाही. ते म्हणत होते की आम्ही हिंदुत्व सोडलं. पण त्यांनी लाज लज्जा सगळेचं सोडलेले आहे. त्यांना सत्ता म्हणजेच सर्वकाही असे वाटले होते. एकदा सत्ता आली की लोक जातात तरी कुठे, असे त्यांना वाटले होते.मात्र आता त्यांना मतदारसंघात जाणे अवघड झाले आहे. तुम्हाला काय कमी पडले होते, तुम्ही असे का केले? असे लोक त्यांना विचारत आहेत. या प्रश्नाला उत्तरं देताना त्यांच्या नाकीनऊ आले आहेत,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लक्ष्य केले.

हेही वाचा >> विरोधकांच्या “ताट वाटी चलो गुवाहाटी”ला एकनाथ शिंदेंचे जशास तसे उत्तर, सभागृहात पिकला हशा

आगामी काळात उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. याबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली. “सध्या आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यानंतर मीदेखील महाराष्ट्रभर दौरा करणार आहे. सध्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा दौरा सुरू आहे. यानंतर गटप्रमुखांचा मेळावा घेण्यात येणार आहे. बघता बघता दसरा मेळावा येईल,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> “जरा दमानं घ्या, मी नवीन प्लेअर, तुम्ही सगळे….; विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं देताना मंगलप्रभात लोढांची दमछाक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पैसा संपेल मात्र निष्ठा कोठून आणणार? निष्ठेचा झरा कोठूण आणणार आहात? ही निष्ठा फक्त शिवसेनेतच आहे. आपण संघर्ष करू. आपण ज्यांना मोठे केले ते गेले. सामान्य माणसांची ताकद माझ्यासोबत आहे. म्हणूनच मला संकटांची चिंता नाही. पर्वा नाही,” असे म्हणत त्यांनी शिवसैनिकांना संघर्ष करण्याचे आवाहन केले.