Uddhav Thackeray on Balasaheb Thackeray : शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोहेंबरला बारावा स्मृतिदिन आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो शिवसैनिक दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी येतील. परंतु, यंदा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने येथे संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्याआधीच उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांना विनंती केली आहे.

माहिम मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी प्रचार केलेला नाही. त्यामुळे याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. आज त्यांनी शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) वचननामा जाहीर करण्याकरता पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते म्हणाले, “माहीम मतदारसंघात प्रचार घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही. माहीम हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. मुंबईत कालची सभा झाली. त्यानंतर आता १७ ची सभा होणार आहे. मुंबईकरांवर माझा विश्वास आहे. मी मुंबईबाहेरच आहे. तरीही मी मुंबईकरांच्या दर्शनाकरता जाणार आहे. आता वेळच अशी आहे की ४-५ सभा घेतल्या तरी सर्व मतदारसंघ पूर्ण करू शकत नाही. दिवसभरात चार सभेच्या वर जास्त सभा होतील असं वाटत नाही.”

हेही वाचा >> Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ९४ उमेदवार रिंगणात, अशी आहे यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर शिवाजी पार्क शिवसेनेच्या सदस्यांसाठी मिळावं

पुढे ते म्हणाले, “शिवाजी पार्कला १७ नोव्हेंबर सभा आहे. मतदानाच्या आधीची ही शेवटच्या रविवारची संध्याकाळ आहे. त्यामुळे आम्ही परवानगी मागितली आहे. १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. याहीवर्षी लाखो शिवसैनिक तिथे येणार. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोग आणि पोलिसांना सांगत आहोत की तिथे तुमच्या आडमुठेपणामुळे संघर्ष येऊ देऊ नका. सर्व शिवसैनिक तिथे येणार आहेत. त्याला आचारसंहिता लागू शकत नाही. कुठेही संघर्षाची ठिणगी पडू द्यायची नसेल तर १७ तारखेला शिवाजी पार्क शिवसेनेच्या सदस्यांसाठी मिळावं.”

शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या वचननाम्यात काय?

  • प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार
  • जात-पात-धर्म-पंथ न पाहता, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलींप्रमाणे मोफत शिक्षण देणार
  • राज्यासाठी नवं गृहनिर्माण धोरण जाहीर करणार
  • कोळी बांधवांना मान्य असेल असा कोळीवाड्यांचा विकास करणार
  • जीवनावश्यक वस्तूंचे दर पुढच्या पाच वर्षांसाठी स्थिर ठेवणार