शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला नागपूर येथे सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिंदुत्वावरून सवाल विचारला आहे.

“२०१४ साली भाजपाने आमच्याबरोबरची युती तोडली. तेव्हा युती का तोडली? त्यावेळी मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि आजही तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे, आमची नाही,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.

हेही वाचा : VIDEO : उद्धव ठाकरेंनी सभागृहात थेट देवेंद्र फडणवीसांची ‘ती’ ऑडिओ क्लिपच ऐकवली; म्हणाले, “नागपूरला लागलेले…”

“आमचं हिंदुत्व देवळात घंटा बडवणारे नाही आहे. हिंदुत्वाच्या पायावर पहिली कुऱ्हाड २०१४ साली भाजपाने मारली आहे. याचं मला वाईट वाटतं. मला पटत नाही, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तरी पटतं का? ज्या दिशेला हिंदुत्व घेऊन जात आहेत, ते स्वयंसेवक संघाला मान्य आहे का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : “गावठी कट्ट्यावर कर्ज देणारी अवलाद…”, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मोहन भागवत मशिदीत जातात. आता ‘मन की बात’ उर्दुत करून मदरशांमध्ये सांगितली जाणार आहे. मग, शिवसेना काँग्रेसबरोबर गेली, तर हिंदुत्व सोडलं,” असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.