Uddhav Thackeray and Raj Thackeray : “उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची पाद्यपूजा करायला हवी होती”, असं वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलं आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे नुकतेच ‘मातोश्री’ येथे (ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं मुंबईतील निवासस्थान) भेट देऊन गेले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी अविमुक्तेश्वरानंद यांची पाद्यपूजा केली होती. तसेच त्यांचं आदरातिथ्य देखील केलं होतं. यावरून प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. तसेच महाजन यांनी अविमुक्तेश्वरानंद यांना ढोंगी असं संबोधलं आहे.

प्रकाश महाजन म्हणाले, “ज्यांच्यावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विज्ञानवादी विचारांचा प्रभाव आहे, ज्यांच्यावर प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव आहे अशा ठाकरे कुटुंबातील सदस्य तथा प्रबोधनकार ठाकरे यांच्या नातवाने एका ढोंगी शंकराचार्याची पाद्यपूजा केली आहे. अविमुक्तेश्वरानंद हे ढोंगी आहेत असा दावा काही लोक करतात. ते खरे शंकराचार्य आहेत की खोटे याबाबत सुप्रीम कोर्टात वाद चालू आहे. त्यांची उद्धव ठाकरे यांनी पाद्य पूजा केली आहे. खरंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आधुनिक विचारसरणीच्या भावाची म्हणजेच राज ठाकरे यांची पाद्यपूजा करायला हवी होती. राज ठाकरेंवर सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांचा प्रभाव आहे, ते प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू शोभतात.”

उद्धव ठाकरेंकडून अविमुक्तेश्वरानंद यांची पाद्यपूजा

बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी १५ जुलै रोजी शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी शंकराचार्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आणि उबाठा गटाचे नेते, पदाधिकारी मातोश्रीवर उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्यांची पाद्यपूजा केली होती. या भेटीनंतर अविमुक्तेश्वरानंद यांनी माध्यमांशी संवाद साधत भेटीमागचं कारणही सांगितलं होतं. तसेच ते म्हणाले होते, उद्धव ठाकरेंबरोबर राजकारणात सर्वात मोठा विश्वासघात झाला आहे. याबाबत त्यांनी दुःखही व्यक्त केलं होतं. उद्धव ठाकरे लवकरच पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होवोत, अशी इच्छा देखील त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.

Swami Avimukteshwaranand met Shiv Sena UBT leader Uddhav Thackeray
Swami Avimukteshwaranand Saraswati : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी शिवसेना फुटीवर भाष्य केले.

हे ही वाचा >> Om Birla : “मंत्रीजी खिशात हात टाकून पुन्हा सभागृहात येऊ नका”, लोकसभा अध्यक्षांचा संताप; महाराष्ट्राच्या खासदारालाही सुनावलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भेटीचं कारण काय?

त्या भेटीचं कारण सांगताना अविमुक्तेश्वरानंद म्हणाले होते, उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर मी मातोश्रीवर आलो आहे. त्यांच्याबरोबर झालेल्या विश्वासघातासाठी आम्ही देखील सहवेदना व्यक्त केल्या. उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बसत नाहीत तोवर आमच्या मनातील दुःख दूर होणार नाही.”