देशाचे गृहमंत्री अमित शाह हे अहमद शाह अब्दालीचे वंशज आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातल्या मेळाव्यात केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं असता त्यांनी यावर उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे प्रचंड फर्स्टेट झाले आहेत त्यातूनच ते असं बोलत आहेत असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे. आज नागपुरात देवेंद्र फडणवीस यांनी ( Devendra Fadnavis ) माध्यमांशी बोलत असताना ही प्रतिक्रिया दिली. पुण्यातल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय म्हणाले? पुण्यात झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपावर आणि अमित शाह यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला. अमित शाह अब्दालीचे वंशज आहेत. अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसंच भाजपाचा राज्यात सत्ता जिहाद सुरु आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आजपासून अमित शाहला मी अहमदशाह अब्दाली म्हणणार, तो मला नकली संतान म्हणतो, औरंगजेब फॅन क्लब म्हणतो म्हणून मी त्याला अहमद शाह अब्दाली म्हणणार, तो अहमद शाह अब्दालीच आहे. त्याला घाबरायचं कारण नाही. कारण ज्या पद्धतीने औरंगजेबाजाची कबर बांधली तशी भाजपाची पक्की कबर बांधा असं उद्धव ठाकरे म्हणाले. हे पण वाचा- Uddhav Thackeray on Amit Shah: “अमित शाह हे अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज”, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका मी ढेकणांना आव्हान देत नाही आता लढाई मैदानात आहे, मी मुंबईत म्हणालो की एक तर मी तर राहीन किंवा तू तरी राहशील. इथे एक पोस्टर लागलंय. त्यातील फोटोत माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवलंय. काहींना वाटलं की मी त्याला आव्हान दिलेय. पण, ढेकणांना आवाहन द्यायचं नसतं तर बोटाने चिरडायचं असतं. मी आव्हान द्यावं इतका मोठा तू नाहीस. काहीजणांना वाटलं की मी त्याला आवाहन दिलेय. तर हे आव्हान चोर-दरोडेखोरांच्या पक्षाला आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीय. तसेच, मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे, मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळक्यांचा पक्ष, असे म्हणत भाजपावरही असंही उद्धव ठाकरे या भाषणात म्हणाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. आज पुण्यातल्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाषण केलं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या डोक्याचा ताबा सुटला आहे असं म्हणत त्यांना उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंचा डोक्यावरचा ताबा सुटला आहे-फडणवीस Devendra Fadnavis यांना उद्धव ठाकरेंबाबत विचारलं असता ते म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत निराशेत आहेत. त्या निराशेतून ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत त्यावर आपण काय उत्तर द्यायचं? फर्स्टेशनमध्ये जो माणूस डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्याला उत्तर द्यायचं नव्हतं. मात्र आजचं भाषण करुन उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं जे अमित शाह म्हणाले होते. अमित शाह त्यांच्याबद्दल म्हणाले होते की ते औरंगजेब फॅन क्लबचेच सदस्य आहेत. आज उद्धव ठाकरेंनी भाषण करुन ते दाखवून दिलं. सचिन वाझेची प्रतिक्रिया मी पाहिली, त्याने मला पत्र पाठवलं हेदेखील मी बातमी पाहिली आहे. हे सगळं पाहिल्यानंतर मी त्यावर प्रतिक्रिया देईन. जे काही समोर येतं आहे त्यासंदर्भात आम्ही योग्य चौकशी करु." असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी स्पष्ट केलं.