शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री तसेच विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीमाना दिला आहे. फेसबूक लाईव्हद्वारे त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी देशातील दंगली तसेच दंगलीदरम्यान राज्यातील स्थितीवर भाष्य केले. सीएए, एनआरसीच्या आंदोलनाचा उल्लेख करुन त्यांनी मुस्लीम बांधवांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा >>>> CM Uddhav Thackeray Resign : उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

“मी तुम्हाला सांगत आलो तुम्ही ऐकत आलात. याकाळात देशात ठिकठिकाणी जातीय दंगली झाल्या. पण महाराष्ट्रात दंगली झाल्या नाहीत. महाराष्ट्रातील समजदार जनतेमुळे हे शक्य झाले. सीएए, एनआरसी यावेळीदेखील अनेक ठिकणी दंगली पेटल्या होत्या. मुस्लीम बांधवही त्याच्यामध्ये आले. मुस्लीम बांधवांनी माझं ऐकलं,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>>> CM Uddhav Thackeray Resign: “रिक्षावाले, टपरीवाले, हातभट्टीवाले यांना शिवसेनेने…”; राजीनामा जाहीर करताना उद्धव ठाकरेंनी मांडली खंत

तसेच, “सगळं सुरळीत सुरु असताना हे अनपेक्षित घडत आहे. मी कुठेही जाणार नाही. मी पुन्हा शिवसेना भवनात बसणार आहे. शिवसैनिकांना भेटायला सुरुवात करणार आहे. पुन्हा एकदा नवीन भरारी मारणारे तरुण, तरुणी या सर्वांना सोबत घेऊन नवीन वाटचाल सुरु करणार आहे,” असे म्हणत ठाकरे यांनी शिवसेना पक्ष नव्याने उभा करणार असल्याचे सांगितले.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>>> SC Orders Floor Test Tomorrow: ठरलं! उद्याच ठाकरे सरकारची विश्वासदर्शक परीक्षा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना त्यांनी शिवसेना हा ठाकरे कुटुंबाकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असे सांगितले. “शिवसेना आपलीच आहे. शिवसेना आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आज मी मुख्यमंत्रिपदाचा राजीमाना देतोय. तसेच मी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीमाना देतोय. कारण मी पुन्हा एकदा येईन असं म्हणालोच नव्हतो. माझ्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांचे आभार मानतो,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.