Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हटलं जातं तरीही उद्धव ठाकरे शांत बसतात. उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) मुस्लिम मतांसाठी ते सहन करावं लागतं या आशयाची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. तसंच राज ठाकरे इतरांना टोप्या घालण्याचं काम करतात असंही उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) म्हटलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

जनाब बाळासाहेब ठाकरे हा काही विषयच नाही. मी मोहन भागवतांचे मशिदीत गेल्याचं फोटो दाखवू का? नरेंद्र मोदींचे फोटो दाखवू का? असे प्रतिप्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारले आहेत. तसंच भाजपाने एकदा जाहीर रकरावं की तुम्हाला मुसलमान नकोत. तुमच्या पक्षात जेवढे मुसलमान आहेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा. असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर राज ठाकरेही असंच बोलतात असं म्हटलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, राज ठाकरेंना तर हाज ठाकरे असं म्हणाले होते लोक. कारण त्यांनी हजला जाणाऱ्या लोकांसाठी काहीतरी मोर्चा काढला की पत्र लिहिलं होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य असं दाखवा की या देशातले सगळे मुस्लिम देशविरोधी आहेत. मुद्दा फक्त देशद्रोही की देशप्रेमी असा आहे. असं उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) म्हटलं आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

देवेंद्र फडणवीस यांना सवाल

देवेंद्र फडणवीस यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की, “नवाब मलिक यांच्याबद्दल तुमची भूमिका काय? नवाब मलिक माझ्या मंत्रिमंडळात होते. त्यावेळी यांनी (देवेंद्र फडणवीस) सगळं नाटक केलं. दाऊदचा साथीदार म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं. त्यानंतर ते जामिनावर बाहेर आले. नागपूरच्या अधिवेशनात नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले होते. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शेजारी बसतात तरीही यांना पत्र लिहावं लागतं की हे योग्य नव्हे बरं. अजित पवारांनी सांगितलं माझा अधिकृत उमेदवार म्हणजे नवाब मलिक आहेत. युती का तोडत नाही? एक माणूस जरी कमी पडला तरीही आम्ही नवाब मलिकांना घेणार नाही हे जाहीर करावं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावं.” असं उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) म्हटलं आहे.

भाजपाची भूमिका दुटप्पी आहे-उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले, “जनाब वगैरे हे तर सगळं सोडा, मोदींवर काय कारवाई झाली? नवाझ शरीफकडे जाऊन ते केक खाऊन आले होते. मोदींचा राजीनामा का घेतला नाही? शिस्तभंगाची कारवाई का केली नाही? भाजपाची मुस्लिमांच्याच बाबतीत नाही तर सगळ्यांच्या बाबतीतली भूमिका दुटप्पी आहे. माझ्याबाबतीत दुटप्पीपणा केला. माझा पाठिंबा हवा होता तेव्हा मोदी म्हणाले होते बाळासाहेब आता राहिले नाही मी उद्धव ठाकरेंशी सल्लामसलत करतो. आता हेच मोदी मला नकली संतान म्हणाले होते.” असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.

Story img Loader