भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर २४ ऑगस्टला त्यांना अटक करण्यात आली होती. २४ ऑगस्टला तारखेला उशिरा रात्री त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेना भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली. २७ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं. नारायण राणे यांना १७ सप्टेंबरपर्यंत दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही अशी ग्वाही सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“दोन्ही निकाल माझ्या बाजून लागले आहेत. देशात अजूनही कायद्याचं राज्य आहे हे दिसून येतं. काही जण माझ्या मैत्रीचा आणि चांगुलपणाचा फायदा उचलतात हेही माझ्या लक्षात आलं आहे. जन आशीर्वाद यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. गेल्या सात वर्षात त्यांनी केलेली काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरु आहे. दुसरं देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्रिपद दिलं. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी सर्व मंत्र्यांना सांगितलं की, तुम्ही तुमच्या राज्यात जा आणि जनतेचा आशीर्वाद घ्या. तुमच्या कामकाजाला सुरुवात करा. १९ ऑगस्टपासून मी माझ्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. आता दोन दिवस विश्रांती घेत परवापासून सिंधुदुर्गातून यात्रेला सुरुवात होईल. त्यामध्ये व्यत्यय पडणार नाही.”, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं. “भाजपा माझ्यामागे खंबीरपणे उभा राहिला त्यासाठी नड्डा साहेब, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस बाकी खासदार आमदार सर्वांचं मला पाठबळ मिळालं मी त्यांचा आभारी आहे.” असंही त्यांनी पुढे सांगितलं.

उद्धव ठाकरेंविरोधात भाजपाची पोलीस तक्रार; योगी आदित्यनाथांबद्दल दसरा मेळाव्यात केलेलं वक्तव्य

“मी असं काय बोललो होतो की राग आला. ते वाक्य काय मी परत बोलणार नाही. कोर्टाचा निकाल येईपर्यंत बोलणार नाही. भुतकाळामध्ये एखादी गोष्ट घडली आणि त्याची माहिती दिली. तो कसा गुन्हा होतो.” असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला. ” ज्यांना देशाबद्दल अभिमान नसतो. त्यांना राष्ट्रीय सण माहिती नसतात. देशाबद्दल अभिमान आहे म्हणून सहन झालं नाही. म्हणून जे आज बोललो ते रेकॉर्डवर आहे.” असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं. “सेना भवनबद्दल अशी कोण भाषा करेल त्याचं थोबडं तोडा. आदेश दिले. हा क्राईम नाही. कलम १२० अंतर्गत गुन्हा होत नाही.”, असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाबाबत उपस्थित केला. “हा योगी आहे की, ढोंगी चपल्लांनी मारले पाहीजे. पवार साहेब, मुख्यमंत्री केलंत त्याचा सुसंस्कृतपणा बघा. एका मुख्यमंत्र्याला बोलतात चप्पलाने मारला पाहीजे.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचाही नारायण राणे यांनी समाचार घेतला. “माननीय शरद पवार साहेब काय सज्जनपणा आहे. एवढं चांगलं करणाऱ्याला त्यांनी मुख्यमंत्री केली. तर त्यांनी चुकीचं केलं असं मला नाही वाटत. काय भाषा आहे. आम्ही तर राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून आम्ही बोललो. कोणी यापुढे असं बोलू नये म्हणून आम्ही बोललो.”, असा टोलाही नारायण राणे यांनी शरद पवार यांना हाणला.

“आम्ही तिघंही मुंबईत नव्हतो. पोलिसांनी जे करायचं आहे ते केलं. तुम्हाला घरं नाहीत. मुलंबाळं नाहीत. आठवणीत ठेवा. तुम्ही कुणी माझं काही करू शकत नाही. तुमच्या कोणत्याही प्रक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हाला सर्वांना आतापर्यंत मी पुरून उरलो आहे. शिवसेना वाढली त्यात माझा मोठा सहभाग आहे. तेव्हा आताचे कुणी नव्हते. अपशब्द बोलणारे पण नव्हते. कुठे काय करत होते माहिती नाही”, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister narayan rane press conference on arrest rmt
First published on: 25-08-2021 at 16:32 IST