Weather Alert, Mumbai-Pune Unseasonal Rain : तीन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. अशातच काल रात्री पुणे, मुंबई राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच गारपीठ झाल्याचंही बघायला मिळालं. काही ठिकाणी होळी दहनाचा कार्यक्रम सुरू असतानाच पाऊस आल्याने अनेकांची तारांबळ उडाली होती. दरम्यान, या गारपिटीने पिकांचं मोठं नुकसान झालं असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – धक्कादायक! विमान उतरण्यापूर्वीच प्रवाशाकडून इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न; एअर होस्टेसवरही केला हल्ला

पुढील काही दिवस राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. काल रात्री पुणे, मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज सकाळीदेखील कल्याण डोंबिवली, जळगाव, नाशिक तसेच अमरावतीसह विदर्भातील काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नाशिक आणि जळगावमधील बागायतदार शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. नाशिकमध्ये द्राक्षांची झाडं कोसळली असून पिकांच मोठं नुकसान झालं आहे. येवल्यात काढणीस आलेला गहू जमीनदोस्त झाला आहे. तर तीन एकर कांदादेखील भिजल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

हेही वाचा – “…म्हणून आम्ही कुलूप तोडलं”, ठाण्यातील शिवसेना शाखेवर ताबा घेतल्यानंतर नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया

जळगावमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊन झाल्याने केळी आणि गहू या पिकांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय पालघरमध्येही गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे आंब्यासह इतर रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच अमरावतीसह विदर्भातील काही भागातही गारपीट झाल्याने कापसांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unseasonal rain on monday night in mumbai pune nashik amravati major crop loss spb
First published on: 07-03-2023 at 09:31 IST