सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रेत गर्दीत भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर करण्याचा प्रकार उजेडात आला असून जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या पथकाने नऊ पीडित मुलांना ताब्यात घेऊन त्यांना बाल सुधारगृहात पाठविले आहे. सिध्देश्वर यात्रेतील धार्मिक विधी संपन्न झाले असले तरी यात्रेत अनेक करमणुकीच्या साधनांसह गृहोपयोगी वस्तू, सौंदर्यप्रसाधने, आकर्षक खेळणी, विविध खाद्यपदार्थ व अन्य दालने सुरू आहेत. दररोज हजारो नागरिक बालबच्च्यांसह यात्रेत येतात.

हेही वाचा >>> अजित पवार गटाच्या नेत्याचे पोस्टर फाडले म्हणून मनसे कार्यकर्त्याला बेदम मारहाण? विजय वडेट्टीवारांनी शेअर केला VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गर्दीमध्ये भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर होत असून त्यासाठी मुलांच्या शरीरावर कृत्रिम चांदीचा रासायनिक रंग लावून त्यांना एखाद्या लाकडी किंवा प्लास्टिकच्या बाकड्यावर उभे केले जाते. यातून नागरिकांचे लक्ष वेधले जाऊन भीक मागितली जाते. अंगभर कृत्रिम चांदीचा रासायनिक रंग लावून छोट्या बाकड्यावर उभा राहून नागरिकांकडून भीक मागणा-या एका मुलाची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली असता अखेर त्याची दखल घेणे प्रशासनाला भाग पडले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांच्या पथकाने सिध्देश्वर यात्रेत फिरून भीक मागणा-या मुलांचा शोध घेतला. बहुसंख्य मुले परप्रांतीय आणि भटक्या विमुक्त जाती-जमातीची असल्याचे सांगितलै जाते.