सोलापूर : धनगर आरक्षण प्रश्नावर दोनच दिवसांपूर्वी सोलापुरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकण्याचा आणि त्यामुळे संबंधित आंदोलक कार्यकर्त्याला भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह पोलिसांनी केलेल्या मारहाणीची घटना ताजी असतानाच जिल्हा परिषदेत धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या दालनाची तोडफोड केली. त्यांच्या नामफलकासह टेबलावर शाई फेकही केली. दरम्यान, पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

बिंदू नामावलीनुसार, धनगर समाजाच्या साडेतीन टक्के आरक्षणाप्रमाणे शिक्षक भरती करावी, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा परिषदेत दुपारी अचानकपणे मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या दालनाची तोडफोड करण्यात आली. शरणू हांडे (सोलापूर), अंकुश केरप्पा गरांडे, धनाजी विष्णू गडदे (मंगळवेढा), सोमलिंग घोडके (अक्कलकोट) अशी आंदोलक कार्यकर्त्यांची नावे असून त्यांनी या आक्रमक आंदोलनाचे समर्थनही केले आहे. हे कार्यकर्ते दुपारी साडेतीनच्या सुमारास जिल्हा परिषदेत आले. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तेथेच यशवंतराव चव्हाण सभागृहात अधिका-यांची समन्वय बैठक घेत होत्या. हे कार्यकर्ते अचानकपणे आव्हाळे यांच्या बंद दालनात शिरले आणि घोषणा देत खुर्च्या-टेबलांची मोडतोड केली. खिडक्यांची तावदानेही फोडली. तसेच आव्हाळे यांच्या टेबलासह त्यांच्या नामफलकावर शाईफेक केली. या घटनेमुळे जिल्हा परिषदेत गोंधळ उडाला.

Kolhapur, bribe, woman food security officer,
लाच स्वीकारताना कोल्हापुरातील अन्नसुरक्षा महिला अधिकारी जाळ्यात
NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
jalgaon voter awareness marathi news, jalgaon voter id marathi news
तुमचे गाव, सोसायटीला सुवर्ण, रौप्य, कांस्य यांपैकी कोणता फलक हवा ? मतदान टक्केवारी वाढीसाठी प्रशासनाचा अनोखा उपक्रम
High Court Stays Caste Certificate Verification Committees Decision to Cancel Rashmi Barves Caste Validity Certificate
रश्मी बर्वे यांना दिलासा! जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती, मात्र…

जिल्हा परिषदेच्या बिंदू नामावलीचे काम पूर्ण झाले आहे. यात शिक्षक भरतीमध्ये धनगर समाजाच्या साडेतीन टक्के आरक्षणाप्रमाणे ही शिक्षक भरती होत नाही, असा या आंदोलक कार्यकर्त्यांचा मुख्य आक्षेप होता.