राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतर दोन आरोपी फरार आहेत. दरम्यान, या घटनेनंतर आता राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापलं आहे. कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून शिंदे सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही ही याप्रकरणावरून सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. इंडिया टीव्ही या वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

“ज्याप्रमाणे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली आहे, हे दुर्दैवी आहे. योजनाबद्ध पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली. हे राज्याचं गृहमंत्रालय तसेच गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे. ही घटना घडली तेव्हा काही पोलीस कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होते. मग त्यावेळी पोलीस नेमकं करत काय होते? खरं तर मुंबईत १५ दिवसांत ही दुसरी घटना घडली आहे. तर वर्षभरात अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. हे पूर्णपण राज्य सरकारचं अपयश आहे”, अशी टीका काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

हेही वाचा – बाबा सिद्दीकींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, बॉलिवूड कलाकारांसह राजकारण्यांनी दिला अखेरचा निरोप!

“…मग हे केंद्रीय गृहमंत्रालयाचे अपयश नाही का?”

“या घटनेत ज्या टोळीचं नाव पुढे येतं आहे, त्याचा मुख्य व्यक्ती गुजरातमध्ये तुरुंगात आहे. असं असताना त्याची टोळी नेमकी कोण चालवतं आहे? तो स्वत: तुरुंगातून ही टोळी चालवत असेल, हे गुजरात सरकारचं तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाचे अपयश नाही का? या टोळीचे फेसबूक पेज नेमकं कोण चालवतं? त्यांच्या फेसबूक पेजवर अद्यापर्यंत बंदी का आणली नाही? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केलं. तसेच हे सगळं करण्यात सरकार अपयशी ठरत असेल, तर आम्ही सरकारला जाब का विचारायचा नाही”, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट, चौथ्या आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश!…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे लोक महाराष्ट्राला नेमकं कुठं घेऊन जात आहेत?”

“आज देशात नेमकं काय सुरू आहे? ना महिला सुरक्षित आहेत, ना शाळेत मुली सुरक्षित आहेत, दर दोनचार दिवसाआड हिट अॅंण्ड रनचे प्रकरणं पुढे येत आहेत. जर गुंडंच मंत्रालयात जाऊन रील्स बनवत असतील, तर तुम्ही काय अपेक्षा ठेवणार? हे लोक महाराष्ट्राला नेमकं कुठं घेऊन जात आहेत”, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.