भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. आपल्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावामुळे उदयनराजे भोसले यांची अनेक वक्तव्य तसंच व्हिडीओ चर्चेचा विषय असतात. यावरुन कधी त्यांचं कौतुक झालं तर कधी त्यांना टीकेचा सामनाही करावा लागला आहे. असाच एक उदयनराजेंचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून हा व्हिडीओ पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

उदयनराजे भोसले हे आपली डायलॉगबाजी, कॉलर उडवणं, वेगाने गाडी चालवणं, डान्स तसंच वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. दरम्यान अनेकदा उदयनराजे गाडी थांबवून सर्वसामान्यांशी गप्पा मारताना, मदत करतानाही दिसले आहेत. अशीच त्यांची एक हळवी बाजू नुकतीच पहायला मिळाली. रस्त्यावर उन्हात उभं राहून पुस्तकं, कॅलेंडर विकणाऱ्या मुलीला मदत करण्यासाठी उदयनराजे यांनी गाडी थांबवून तिच्याकडून सर्व गोष्टी विकत घेतल्या आणि आर्थिक मदत केली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

व्हिडीओत उदयनराजे गाडीत बसलेले दिसत आहेत. यावेळी ते त्या मुलीकडील सर्व पुस्तकं आणि कॅलेंडर्स विकत घेत तिला पैसे देतात. इतकंच नाही तर ही पुस्तकं अनाथलायतील मुलांना देण्यास सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहून उदयनराजे यांचं कौतुक केलं जात आहे.