८२ जागांसाठी २४६ उमेदवार निवडणूक िरगणात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड जिल्ह्य़ातील पाच नगरपंचायतींसाठी येत्या १० जानेवारीला मतदान होणार आहे. यात खालापूर, माणगाव, तळा, म्हसळा आणि पोलादपूर नगरपंचायतींचा समावेश असणार आहे. पाच नगरपंचायतींमधील ८२ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत २४६ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागणार आहे. तळा नगरपंचयातीच्या १७ प्रभागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी ७९ नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली होती. यातील ३० नामनिर्देशनपत्रे अपात्र ठरले, ७ जणांनी माघार घेतली. त्यामुळे ४१ उमेदवार निवडणूक िरगणात शिल्लक राहिले आहेत. प्रभाग क्रमांक ३ मधील १ जागा बिनविरोध झाली.

खालापूर नगरपंचायतीच्या १७ प्रभागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी ८७ नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली होती. छाननीनंतर ६६ नामनिर्देशनपत्रे वैध ठरले तर २१ नामनिर्देशनपत्रे अवैध ठरले, १० जणांनी माघार घेतली. त्यामुळे ५३ उमेदवार निवडणूक िरगणात शिल्लक राहिले आहेत.

माणगाव नगरपंचायतीच्या १७ प्रभागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी तब्ब्ल ११५ नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली होती. छाननीनंतर ६२ उमेदवारी अर्ज वैध ठरले, तर ५३ नामनिर्देशनपत्रे अपात्र ठरले, ६ जणांनी माघार घेतली. त्यामुळे ५६ उमेदवार निवडणूक िरगणात शिल्लक राहिले आहेत.

पोलादपूर नगरपंचयातीच्या १७ प्रभागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी ६४ नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली होती. छाननीत यातील ५३ नामनिर्देशनपत्रे वैध ठरली, तर ११ नामनिर्देशनपत्रे अवैध ठरले, १० जणांनी माघार घेतली. त्यामुळे ४२ उमेदवार निवडणूक िरगणात शिल्लक राहिले आहेत. प्रभाग क्रमांक सहामधील एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली.

म्हसळा नगरपंचायतीच्या १७ प्रभागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी ७३ नामनिर्देशनपत्रे पात्र झाली होती. छाननीत यातील ७२ नामनिर्देशनपत्रे वैध ठरले, तर केवळ एक नामनिर्देशनपत्र अवैध ठरले, १८ जणांनी माघार घेतली. त्यामुळे ५४ उमेदवार निवडणूक िरगणात शिल्लक राहिले आहेत. प्रभाग क्रमांक १७ मधील १ जागा बिनविरोध झाली.

जिल्ह्य़ातील सर्व तालुक्याच्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. याअंतर्गत खालापूर, तळा, म्हसळा, माणगाव, पोलादपूर आणि पाली ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला आहे. मात्र सुधागडपाली येथील लोक या निर्णयाविरोधात न्यायालयात गेले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाने पाली येथील नगरपंचायत निवडणुकीला स्थगिती दिली होती. त्यामुळे पाली नगरपंचायतीसाठी सध्या निवडणूक होणार नाही.

More Stories onरायगडRaigad
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voting on 10 january for five nagar panchayat in raigad
First published on: 07-01-2016 at 03:23 IST