करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या १४ जणांना वाई पोलिसांनी भीम नगर तिकटण्यात ताब्यात घेतले. हे सर्वजण वसुलीसाठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. यातील काही लोकांचा पुण्यातील गजा मारणे टोळीशी देखील संबंध असल्याचे समजल्याने त्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या १४ जणांना वाई पोलिसांनी भीम नगर तिकटण्याच्या तपासणी नाक्यावर दुपारी ताब्यात घेतले. हे सर्व जण पाचगणी व वाई येथील दोघांकडे पैशाच्या वसुलीसाठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले. या प्रकरणात संबंधितांचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरु होते. उशिरा पर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नव्हती.

वाई येथील बांधकाम व्यावसायिक व पाचगणी येथील एका शाळेच्या चालकाशी संबंधित पैशाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारातील वसुलीसाठी पुण्यातील हे १४ जण तीन मोटारीतून वाईला आले होते. पाचगणी व नंतर वाईत एकाच्या घरी जाऊन पुणे-महाबळेश्वर रस्त्यावरील वाई भीमनगर तिकाटण्यातील तपासणी नाक्यावर त्यांच्या गाड्या अडविण्यात आल्या. पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे व कर्मचाऱ्यांनी त्यांना वाई पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे.

पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती कळविण्यात आली आहे. त्यांच्या कडून दप्तर अहवाल मागविण्यात आला आहे. या १४ जणातील अनेक जण गजा मारणे टोळीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांकडून समजली आहे. या सर्वांकडे कसून चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी संबंधित बिल्डर व पाचगणीतील शाळा चालकालाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. या दोघांनी संबंधित १४ जणांविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे तोंडी सांगितल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान पुण्यातील पोलीस अहवालाच्या प्रतीक्षेत उशिरा पर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. मात्र त्यांच्यावर जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा पोलीस प्रथम दर्शनी दाखल करणार आहेत व नंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. वाई पोलीस ठाण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रमेश गर्जे व पथक दाखल झाले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wai 14 arrested for recovery some have a connection with gajya marne gang msr
First published on: 29-04-2021 at 21:46 IST