लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : एकीकडे उजनी धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावत असताना याच धरणातून सोलापूरसाठी पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पाच ठिकाणी गळती सुरू झाली आहे. ही गळती रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहराचा पाणीपुरवठा चार दिवसाआड ऐवजी पाच दिवसाआड करण्याचा निर्णय घेतला आहे.

water supply, Kandivali,
कांदिवली बोरिवलीमध्ये गुरुवारपासून २४ तास पाणीपुरवठा बंद
Water scarcity, Badlapur, Ambernath,
बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी पाणीबाणी; तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद
water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ
Why three new swimming pools will start in Mumbai How to plan the municipal corporation
पाण्याचा तुटवडा, तरीही मुंबईत तीन नवे जलतरण तलाव का सुरू होणार? महापालिकेचे नियोजन कसे?

मागील पावसाळ्यात पुरेशा पावसाअभावी गेल्या ऑक्टोंबरपर्यंत उजनी धरण ६०.६६ टक्क्यांपर्यंत भरले होते. परंतु धरणातील पाणी वाटपाच्या नियोजनाचे तीनतेरा वाजल्यामुळे सध्या धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात खालावला आहे. धरणातील पाणीसाठा उणे पातळीवर १८.६५ टक्क्यांपर्यंत खालावला असतानाच सोलापूरसह पंढरपूर व सांगोला आदी शहरांसाठी गेल्या ११ मार्चपासून धरणातून सहा टीएमसी पाणी भीमा नदीवाटे सोडले जात आहे. गेल्या पाच दिवसांत धरणातील तीन टीएमसी पाणी संपले असून आणखी तीन दिवस म्हणजे १९ मार्चपर्यंत पाणी सोडले जाणार आहे.

आणखी वाचा-आचारसंहिता लागू होताच राजकीय पक्षांच्या कार्यालयांवरील फलकांवर झाकले कापड

दरम्यान, शनिवारी धरणातील पाणीसाठा उणे २४.२६ टक्के इतका खालावला आहे. उणे पातळीतील १३ टीएमसी वापरण्यात आले आहे. सध्या धरणात ५०.६६ टीएमसी पाणीसाठा असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात धरणात खाली साचलेला गाळ, वाळूचे प्रमाण किती, हा संशोधनाचा विषय ठरल्यामुळे प्रत्यक्ष शिल्लक पाणीसाठा किती, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.