वेगळा विदर्भ हा भाजपचा प्रमुख मुद्दा आहे. वेळ आल्यावर बहुमताच्या आधारे तो प्रश्न निकाली काढला जाईल, असे भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सांगितले. जालना मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी प्रथमच ते आले होते. लाडसावंगी येथे होणाऱ्या जाहीर सभेपूर्वी पत्रकारांशी ते बोलत होते.
भ्रष्टाचार व महागाईमुळे जनता त्रस्त आहे, त्यामुळे काँग्रेसच्या विरोधात वातावरण आहे. राज्यात भाजप व मित्रपक्षाला ३५ जागा मिळतील. विदर्भातील सर्व जागांवर विजय मिळेल, असा दावाही गडकरी यांनी केला. काँग्रेस बहुअंगाने जातीय असल्याचा आरोप करीत मोदींचे सरकार आल्यास कोणते मंत्रिपद कोणाला, या चच्रेतील खात्यांची वाटणी आपणास माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाडय़ातून गोपीनाथ मुंडे यांना कृषिमंत्री व्हायला आवडेल, असे सांगितले जाते. त्यावर बोलण्यास नकार देत भाजपने असे काही ठरवले नाही, असे त्रोटकपणे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Way of independent vidarbha on majority government nitin gadkari
First published on: 22-04-2014 at 01:45 IST