आम्ही दगड मारून सभा बंद करणारे लोक आहोत असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. जळगावातल्या पाचोरा या ठिकाणी २३ एप्रिलला उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. त्या सभेच्या आधी गुलाबराव पाटील विरूद्ध संजय राऊत असा सामना पाहण्यास मिळतो आहे. मी वाघ आहे मला कुठल्याही सुरक्षेची गरज नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता आम्ही दगड मारून सभा बंद करणारे लोक आहोत संजय राऊत यांना आंदोलन कसं करतात माहित नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे गुलाबराव पाटील यांनी?

“हे जे काही नतद्रष्ट लोकं आहेत ज्यांनी शिवसेनेची वाट लावली. त्यांना आमचा विरोध आहे. आमचा हा विरोध कायम राहिल. ते म्हणाले मी पाय ठेवतो, पाय ठेवला. स्टेशनवर दिसलं स्टेशनवर काय झालं. आमचे कार्यकर्ते येऊन गेले. आम्हाला तुम्ही शिकवू नका राऊत. संजय राऊत हे कुठल्याच आंदोलनात नव्हते. त्यांना शिवेसेनेचं आंदोलन कसं असतं माहित नाही. दगड मारून आंदोलन आणि सभा बंद करणारे लोक आहोत आम्ही. त्यामुळे राऊतांनी आम्हाला चॅलेंज करू नये.” असं म्हणत गुलाबराव यांनी इशारा दिला आहे.

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?

“सभा तर जोरदार होणार आहे रविवारी. आरवतात्या पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरणही उद्या होणार आहे. आरवतात्या आणि शिवसेनेचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचं कृषी क्षेत्रात केलेलं काम मोठं आहे. त्यांच्या पुतळ्याचं अनावरण उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रात या सभेची चर्चा आहे. संपूर्ण पाचोरा आणि संपूर्ण महाराष्ट्र या सभेची वाट पाहतो आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाघाला कसली सुरक्षा हवी?

“मला सुरक्षेची गरज नाही. मी समर्थ आहे. वाघाला सुरक्षेची गरज लागते का सुरक्षेची? मी समोरून अंगावर जाणारा माणूस आहे. हे बंदुकवाले, स्टेनगनवाले, बॉडीगार्डस हे कधी बघताय का माझ्या आजूबाजूला? असले तरी मी बाजूला ठेवतो. मी एकटाच फिरतो. शिवसैनिक असतात सोबत. शिवसैनिकांच्या अंगावर जाणं सोपं नाही. जो बेईमान असतो, बाडगा असतो तो जरा मोठ्याने बांग देतो तसं मी जळगावात पाहतो आहे” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे आणि गुलाबराव पाटील यांना टोला लगावला आहे.