बारसूतल्या लोकांवर अत्याचार केला जातो आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी उद्धव ठाकरे पोहचत आहेत. आंदोलकांचं म्हणणं उद्धव ठाकरे समजून घेणार आहेत. त्यानंतर ते महाडला सभेसाठी जाणार आहेत. उद्धव ठाकरेंना पाय ठेवू देणार नाही या धमक्या देणाऱ्यांना गृहमंत्र्यांनी अटक केली पाहिजे असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही बारसूच्या कष्टकऱ्यांसोबत आहोत, भांडवलदारांच्या दलालांसोबत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ठाकरे कुटुंब आणि कोकण याचं एक नातं आहे

शिवसेना, ठाकरे कुटुंब आणि कोकण असं एक नातं आहे. शिवसेना ही भांडवलदारांची दलाल नाही. शिवसेना तिथले शेतकरी, कष्टकरी यांच्यासोबत आहेत. जे भांडवलदारांचे दलाल आहेत त्यांना त्यांच्या गुंतवणुकीची चिंता आहे. परप्रांतियांच्या माध्यमातून या दलालांनी गुंतवणूक केली आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे. अख्खी शिवसेना तिकडे जागेवर आहे का येऊ देणार नाही? पोकळ धमक्या देणं बंद करा असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आम्ही आंदोलकांसोबत, कष्टकऱ्यांसोबत

या देशात, राज्यात लोकशाही आहे. आंदोलक कुणाच्या जमिनी हिसकावून घेण्यासाठी आंदोलन करत आहेत. ते आपली जमीन वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. आपली जमीन वाचवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. जमीन त्या आंदोलकांची आई आहे असंही राऊत यांनी म्हटलं आहे.रोजगाराचं आमीष दाखवलं जातं आहे ते तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं जातं आहे. आम्ही जमिनींचं रक्षण करणाऱ्यांच्या सोबत आहोत असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवारांचा राजीनामा मागे घेण्यावरही प्रतिक्रिया

जे काही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या बाबतीत घडलं त्याला शक्ती प्रदर्शन म्हणणं हे मला उचित वाटत नाही. शरद पवार हे संस्थापक अध्यक्ष आहेत. हा पक्ष शरद पवारांच्या नावाने ओळखला जातो. आम्ही जसं बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलं. तसे फार मोठे नेते शरद पवार आहेत. शरद पवारांनी बहुदा एक भावनिक निर्णय घेतला आहे. त्यांनी लोकांच्या आग्रहासाठी तो निर्णय मागे घेतला असेल तर आम्हाला आनंद आहे. पुढच्या निवडणुकांसाठी शरद पवारांनी मैदानात असणं आवश्यक आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.