सोलापूर : कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना सोलापूर शहरात सामान्य नागरिकांना सुरक्षिततेची हमी वाटेल, अशा कार्यक्षमतेने प्रशासन चालवू, अशी ग्वाही शहराचे नवे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली. सोमवारी सायंकाळी नवनियुक्तख पोलीस आयुक्त राजकुमार यांनी मावळते पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पोलीस आणि नागरिकांतील संवाद चांगल्या प्रकारे टिकवून ठेवण्यावर भर दिला.

हेही वाचा >>> उजनी धरण पाणी प्रश्न पेटण्याची चिन्हे; पुण्यातून पाणी न सोडण्याची अजित पवारांची भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार बोलून दाखविताना राजकुमार यांनी यापूर्वी जळगाव येथे  पोलीस अधीक्षकपदावर केलेल्या कामाचा दाखला दिला. जळगावमध्ये दीड वर्षाच्या कार्यकाळात तब्बल ५६ गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याखाली स्थानबध्दतेची कारवाई करून गुन्हेगारीला आळा घातल्याचा दावा त्यांनी केला. मावळते पोलीस आयुक्त डॉ. माने यांना सुमारे दीड वर्षाचा कार्यकाल मिळाला. त्यांची बदली नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत सहसंचालकपदार झाली आहे. त्यांना निरोप आणि नूतन पोलीस आयुक्त राजकुमार यांचे शहर पोलीस आयुक्तालयात स्वागत करण्यात आले.