Ladki Bahin Yojana update: अलिबाग- लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. सप्टेंबर महिन्याच्या लाभाचे वितरण आजपासून सुरू होणार आहे. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम येत्या २ ते ३ दिवसात जमा होणार आहे.  मात्र त्याच वेळी ज्या लाभार्थ्यांनी अद्यात ई केवायसीची प्रक्रीया पूर्ण केली नाही, त्यांनी पुढील दोन महिन्यात ही प्रक्रीया पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसरकारने ई केवायसी प्रक्रीय ऑनलाईन पध्दतीने सुरू केली आहे. यात काही तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत्या, आधार नंबर टाकल्यानंतर लाभार्थ्यांना ओटीपी जात नसल्याच्या तक्रारींचा प्रामुख्याने यात समावेश होता. पण आता त्या दूर करण्याचे काम सुरू असल्याचेही आदिती तटकरे यांनी नुकतेच केले होते.

दिवाळी पूर्वी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यानां सन्मान निधी देता यावा यासाठी प्रयत्न सुरु होते. नुकताच सामाजिक न्याय विभागाकडचा ४१० कोटींचा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळवण्यात आला होता. हा निधी प्राप्त होताच, तातडीने निधी वितरण सुरू करण्याचे निर्देश राज्यसरकारने महिला व बाल विकास विभागाला दिले होते. त्यामुळे शुक्रवारपासून लाभार्थ्यांच्या खात्यात  निधीचे वितरण सुरु होणार आहे. त्यामुळे योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दिलासा मिळणार आहे.

राज्यातील जवळपास दोन कोटी महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ दिला जात आहे. या सर्व पात्र लाभार्थ्यांची निरंतरपणे पडताळणी केली जात आहे. पडताळणी दरम्यान अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे बंद करण्यात आले आहेत.  लाभ थांबविण्यात आलेल्या लाभार्थ्यां मध्ये आधारकार्डप्रमाणे २१ वर्षे वयापेक्षा कमी अथवा ६५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे. या शिवाय रेशनकार्डनुसार ज्या कुटूंबात दोन पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत आहे अशा कुटूंबात महिलांचा प्रामुख्याने समावेश आहे