महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंडयाचे काल पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झाले. मनसेचा नवा झेंडा कसा असेल? त्यामध्ये कुठले रंग असतील? याबद्दल बरीच उत्सुक्ता होती. अखेर गुरुवारी गोरेगाव येथे पार पडलेल्या पक्षाच्या पहिल्या महाअधिवेशनात या झेंडयाचे अनावरण झाले. मनसेच्या झेंडयाचा रंग कसा असेल, त्याबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये बरीच चर्चा सुरु होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारण झेंडयाच्या रंगावरुन मनसेची भविष्यातील राजकीय विचारधारा कुठल्या दिशेने जाणार ते स्पष्ट होणार होते. त्यामुळे मनसेच्या झेंडयाबद्दल बरेच कुतूहल होते. अखेर काल हा झेंडा समोर आला. मनसेचे यापुढे दोन झेंडे असणार आहेत. एका झेंडयामध्ये भगव्या रंगासह राजमुद्रा आहे तर, दुसऱ्या झेंडयामध्ये भगवा रंग आणि मधोमध पक्षाचे निवडणूक चिन्ह इंजिन आहे.

मनसेचा नवीन झेंडा कोणी साकारला?
सौरभ करंदीकर या मराठमोळया तरुणाने मनसेचा हा नवीन झेंडा साकारला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंडयाचं काल अनावरण झालं. राज ठाकरे यांच्या मनातल्या झेंडयाचं आरेखन करण्याची, त्याला मूर्त स्वरूप देण्याची संधी मिळाल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सौरभ करंदीकर हे डिझायनर असून, ते जाहीरात क्षेत्राशी संबंधित आहेत. जाहीरात व्यवसायात आर्ट डायरेक्टर, क्रिएटीव्ह हेड अशा पदांवर काम केले आहे.

निवडणूक प्रचारात राजमुद्रा असलेल्या झेंडयाचा वापर नाही
निवडणूक प्रचारासाठी राजमुद्रा असलेला झेंडा नको असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केलं. ज्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे तो झेंडा निवडणूक प्रचारात वापरायचा नाही असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is saurabh karandikar who design mns flag dmp
First published on: 24-01-2020 at 21:54 IST