लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : यंदाच्या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण उद्या शनिवारी दिसणार असून ते भारतासह जगातील अनेक देशांमध्ये खगोलप्रेमींना पाहता येईल. पुढील चंद्रग्रहण दोन वर्षांनंतर म्हणजे २५ सप्टेंबर २०२५ रोजी खंडग्रास चंद्रदर्शन आहे, असे सोलापूर विज्ञान केंद्राचे संग्रहालय अध्यक्ष राहुल दास यांनी सांगितले.

उद्या २८ ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला या वर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण असून ते भारतासह आशिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका, आॕस्ट्रेलिया या खंडातील नागरिकांना दिसेल. मात्र हे चंद्रग्रहण डोळ्यांना विशेष जाणवणार नसल्याची कारण मिमांसाही त्यांनी केली.

आणखी वाचा-सोलापूर: पॕलेस्टिनींच्या रक्षणासाठी मुस्लिमांची सामूहिक प्रार्थना; अमेरिकन व इस्त्रायली उत्पादनांवर बहिष्काराची हाक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेला लागत नाही. कारण चंद्रकक्षा व क्रांतिवृत्त समपातळीत नसून त्यांच्या पातळ्यांमध्ये ५ अंशांचा ९ वा कोन आहे. चंद्रग्रहण पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे दिसते. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते. पृथ्वीपेक्षा सूर्याचा आकार बराच मोठा असल्यामुळे पृथ्वीची अवकाशात गोलाकारा मुख्य गडद छाया आणि त्याभोवती फिकट उपछाया अस्तित्वात असते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीतून प्रवास झाला तर ग्रहण किंवा खंडग्रास चंद्रग्रहण दिसते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतालीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला तर छायाकल्प चंद्रग्रहण दिसते. उपछाया चंद्रग्रहणाच्यावेळी पौर्णिमेला तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला दिसतो. चंद्रावर पृथ्वीची गडद छाया पडणार नसल्यामुळे डोळ्यांनी हे ग्रहण विशेष जाणवत नाही, असे खगोलशास्त्रज्ञ राहुल दास यांनी सांगितले.