औषधोपचारासाठी ताब्यात घेतलेल्या रानगव्याचा मंगळवारी ह्दयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सोमवारी वन विभागाने वाळवा तालुक्यातील कामेरीच्या शिवारात या रानगव्याला उपचारासाठी ताब्यात घेतले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- सांगली जिल्ह्यातील ४१ बालकांवर मुंबईत होणार मोफत ह्रदय शस्त्रक्रिया

कामेरी (ता. वाळवा) येथील पाचवा टप्पा या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रात शनिवार पासून आढळून येत असलेल्या एका नर जातीच्या रानगव्यास सोमवारी सुरक्षित रित्या उपचाराकरिता व नैसर्गिक अधिवासात सोडण्याकरता वन विभागाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर ताब्यात घेतले पासून सदर गव्यावर शर्तीचे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान गव्यामध्ये विविध आजार निष्पन्न झाले. ज्यामध्ये किडनी व यकृतामध्ये समस्या आढळून आल्या. सदर गव्याचा मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर निष्पन्न झाले.

हेही वाचा-

सदर मृत गव्याचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी अंबादास माडकर यांनी केले. शवविच्छेदन करतेवेळी उपवनसंरक्षक नीता कट्टे, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजने सहायक वनसंरक्षक सांगली, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल सुरेश चरापले वनपाल, प्राणी मित्र युनूस मनेर , अमित कुंभार उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wild bull died of cardiac arrest who found in sugarcane field in valwa taluka sangli district dpj
First published on: 06-12-2022 at 22:04 IST