एअर इंडियाच्या विमानात विंचवाने एका महिलेला दंश केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २३ एप्रिल रोजी नागपूरहून मुंबई जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ही घटना घडली. दरम्यान, विमान मुंबई विमानतळावर उतरताच महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे.

हेही वाचा – मुस्लीम विद्यार्थ्याची कमाल! संस्कृत बोर्डाच्या परिक्षेत राज्यात अव्वल, १३ हजार मुलांना टाकलं मागे

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, २३ एप्रिल रोजी एअर इंडियांच्या एआय ६३० विमानाने नागपूरहून मुंबईसाठी उड्डाण केले होते. मात्र, उड्डाण भरल्याच्या काही मिनिटांनंतर विंचवाने विमानातील एका महिलेला दंश केला. याची माहिती पायलटला मिळतात, त्यांनी मुंबई विमानतळावर वैद्यकीय पथक तैनात करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विमान मुंबई विमानतळावर उतरताच महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती आता स्थिर असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा – Operation Kaveri : कावेरी मोहीम फत्ते, सुदानमध्ये अडकलेले सर्व भारतीय मायदेशी परतले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यासंदर्भात एअर इंडियाच्यावतीनेही निवेदन जारी करण्यात आले आहे. २३ एप्रिल २०२३ रोजी एअर इंडियाच्या एआय ६३० या विमानात विंचवाने एका महिलेला दंश केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विमान मुंबई विमानतळावर उतरताच महिलेला वैद्यकीय मदत देण्यात आली. तसेच आमच्या आमच्या कर्मचाऱ्यांनी विमानाची तपासणी केली असता, त्यांना एक विंचूही आढळून आला. योग्य प्रक्रियेनंतर त्याला बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असं एअर इंडियाने निवेदनात म्हटलं आहे.