scorecardresearch

शांताबाई कांबळे यांचे निधन, मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्र लेखिका

दलित पँथरचे नेते दिवंगत प्रा. अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत्या. गेली काही वर्षे त्या मुलगी मंगल तिरमारे यांच्याकडे वास्तव्यास होत्या.

शांताबाई कांबळे यांचे निधन, मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्र लेखिका
शांताबाई कांबळे यांचे निधन (image – लोकसत्ता टीम)

सांगली : मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्राच्या लेखिका शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचे बुधवारी सकाळी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. त्या शंभर वर्षांच्या होत्या. दलित पँथरचे नेते दिवंगत प्रा. अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत्या. गेली काही वर्षे त्या मुलगी मंगल तिरमारे यांच्याकडे वास्तव्यास होत्या.

हेही वाचा – पुणे : अपघाताच्या बनावाने मोटारचालकाला लुटले, डेक्कन काॅलेज रस्त्यावरील घटना

हेही वाचा – ‘आयसर पुणे’तील डॉ. दीपक धर यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान

शांताबाई यांचा जन्म 1 मार्च 1923 रोजी आटपाडी येथे झाला. सोलापूर स्कूल बोर्डामध्ये त्यांनी पहिली दलित शिक्षिका म्हणूनही काम केले. यानंतर काही काळ सांगली जिल्ह्यातील जतमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणूनही काम केले. निवृत्तीनंतर त्यांनी माझ्या जल्माची चित्तरकथा पुस्तक रुपाने लोकांसमोर मांडली. याच आत्मकथेवर आधारित दूरदर्शनवर १९९० मध्ये नाजुका या नावाने मालिका प्रसारित केली. या मालिकेला प्रचंड लोकप्रियताही लाभली होती. या आत्मकथेचे फ्रेंच, इंग्रजी, हिंदी भाषेत पुस्तकरुपाने अनुवाद प्रसिद्ध झाले. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, तीरमारे गुरुजी यांचा सहवास लाभला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 23:04 IST

संबंधित बातम्या