श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर संभाजी भिडे यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. अशातच यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘दाभोलकरांसारखी गत करू,’ अशी धमकी देण्यात आल्याची माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, “मनोहर कुलकर्णी हे सगळीकडे फिरत आहेत. पण, मला ‘दाभोलकरांची जशी गत केली, तशी तुमची करू,’ अशी धमकी देण्यात आली. महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांच्याबद्दल काहीही वक्तव्य केली जातात. आम्ही ***खोर म्हणलं, तर धमकी दिली जाते.”

हेही वाचा : “आपली औकात…”, संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर बच्चू कडू संतापले; म्हणाले, “नांग्या ठेचल्या पाहिजेत!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“फडणवीस आम्हाला यात ओढू नका म्हणतात. तर, अमरावतीचे राज्यसभा खासदार आमच्याविरोधात तक्रार देण्यासाठी गेले होते. आमचा जीव गेला तरी चालेल, पण यांचं सर्व उघड करणार आहे. माझ्या जीवाला काही झालं, तर याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. भिंडेंना प्रोस्ताहन देण्यात येत आहे. भिडेंना पोलीस सुरक्षा देत आहेत. मात्र, आम्हाला नाही,” अशी खंत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.