मार्च महिन्यात झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावीचा यवतमाळ जिल्ह्याचा निकाल ९४.६३ टक्के इतका लागला. अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा चौथ्या क्रमांकावर राहिला. आज बुधवारी ऑनलाइन जाहीर झालेल्या या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ३९ हजार २१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ३८ हजार ८६३ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात एकूण ३६ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १० हजार ६५१ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. १४ हजार ७१४ विद्यार्थी प्रश्रम श्रेणीत, नऊ हजार १३६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर दोन हजार २७७ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले.
नेर तालुका आघाडीवर
यवतमाळ जिल्ह्यात नेर तालुक्याने आघाडी घेतली. नेर तालुक्यातील दहावीचा निकाल ९७.०६ टक्के लागला. त्याखालोखाल दिग्रस – ९६.४३, पुसद – ९६.२८, यवतमाळ – ९५.६९, महागाव ९४.८८, आर्णी – ९४.१६, पांढरकवडा – ९४.१२, घाटंजी – ९४.०६, उमरखेड – ९३.७१, वणी – ९३.६१, मारेगाव – ९३.५३, दारव्हा – ९३.२५, झरी – ९२.८९, कळंब – ९२.६८, राळेगाव – ९२.४१ तर बाभूळगाव तालुक्याचा निकाल ९२.२२ टक्के इतका लागला.