जिल्हय़ातील इतर नेत्यांच्या भूमिकेबद्दल आपल्याला माहीत नाही, मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर लायक अधिकारी नाहीत, असे आपले मत असल्याने त्यांच्या विरोधात होतो. त्यामुळे त्यांची बदली मीच केली, असे मान्य करत केंद्रेकर हे सर्वसामान्य लोकांविरुद्ध भूमिका घेणारे अधिकारी होते, असे मत राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार सुरेश धस यांनी जाहीर कार्यक्रमात व्यक्त केल्याने खळबळ उडाली.
 बीड लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीवर एका वृत्तवाहिनीने शनिवारी सौभाग्य मंगल कार्यालयात सर्व पक्षांचे उमेदवार आणि नागरिकांच्या थेट प्रश्नावर कार्यक्रम घेतला. या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस, आम आदमी पार्टीचे नंदू माधव, तर भाजपच्या वतीने रमेश पोकळे यांनी भूमिका मांडली. या वेळी उपस्थितांमधून भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक स्वच्छ प्रशासन देणारे सुनील केंद्रेकर यांची बदली का केली, असा थेट प्रश्न धस यांना विचारला गेला. त्या वेळी धस यांनी ‘होय, केंद्रेकरांची बदली मीच केली’, असे म्हटले. केंद्रेकर हे सर्वसामान्य लोकांविरुद्ध भूमिका घेणारे अधिकारी होते. ते कौतुकास पात्र नव्हते. येथे राहण्यास ते लायक अधिकारी नव्हते, असे आपले मत होते. त्यामुळे पहिल्यापासूनच आपण त्यांच्या विरोधात होतो. दुष्काळात केंद्रेकरांनी आम्ही आणलेल्या योजनांना विरोध केला, त्यामुळे त्यांची बदली केली. इतर लोकप्रतिनिधींचे त्यांच्याबद्दलचे मत आपल्याला माहीत नाही असे सांगितल्यावर कार्यक्रमात गोंधळ सुरू झाला. केंद्रेकर यांच्यासाठी सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली. दोन वेळा सरकारला जनतेच्या रेटय़ापुढे केंद्रेकरांची बदली थांबवावी लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yes i do transfer of sunil kendrekar suresh dhas
First published on: 31-03-2014 at 01:55 IST