योग आणि निसर्गोपचार यांच्या विकासाची संधी निर्माण करतानाच या व्यवसायाला कायदेशीर मान्यता देणे आवश्यक आहे. योग हा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झाला असून, या माध्यमातून रोजगार निर्माण होऊ शकेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधान परिषदेत व्यक्त केला.
तावडे यांनी विधानपरिषदेत मांडलेले महाराष्ट्र योग व निसर्गोपचार विधेयक संमत करण्यात आले. विधानसभेमध्ये मंगळवारी या विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे योग व निसर्गोपचार पद्धतीला कायदेशीर मान्यता मिळणार आहे.
योग व निसर्गोपचार ही स्वास्थ्य व रोगमुक्तीची प्राचीन शास्त्रे आहेत. आज ही शास्त्रे जगभरात लोकप्रिय आहेत. या शास्त्रांमधील अध्यापन व त्यांचा व्यवसाय यांचे विनियमन करुन त्यांचा विकास करणे, हा या विधेयकाचा प्रमुख उद्देश आहे असे विनोद तावडे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2016 रोजी प्रकाशित
योग व निसर्गोपचार विधेयक विधान परिषदेत मंजूर
तावडे यांनी विधानपरिषदेत मांडलेले महाराष्ट्र योग व निसर्गोपचार विधेयक संमत करण्यात आले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-04-2016 at 18:58 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga and naturopathy bill passed in legislative council