शेत-रस्त्याच्या वादातून समाधान निंबा शेवाळे (२८) या तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना येथून जवळच असलेल्या नगाव येथे घडली. तालुका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून एकास अटक केली आहे. मुख्य संशयितासही त्वरित अटक करावी, या मागणीसाठी नातेवाइकांनी तालुका पोलीस ठाण्यास घेराव घातला होता. हत्या झालेल्या तरुणाची आई ताईबाई यांनी या संदर्भात तक्रार दिली. शेवाळे कुटुंब नगाव शिवारातील शेतात वास्तव्यास असून त्यांच्या शेतालगत विजय जगन खैरनार (रा. कौळाणे) याचे शेत आहे. विजयने शेतात जाण्यासाठी शेवाळे कुटुंबीयांकडे रस्त्याची मागणी केली होती. त्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. यासंबंधीचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. शुक्रवारी संध्याकाळी समाधान शेतात नांगरणी करीत असताना विजय व त्याचा भाऊ सुरेश हे दोघे तिथे आले. शिवीगाळ करीत त्यांनी समाधानवर हल्ला चढविला. त्यात तो जागीच कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत समाधानला त्याच्या नातेवाइकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून सुरेश खैरनारला अटक केली. मात्र मुख्य संशयित विजय हा फरार झाला आहे. त्याला अटक केल्याशिवाय समाधानचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला. शनिवारी दुपारी नातेवाईक व नगावच्या गावकऱ्यांनी तालुका पोलीस ठाण्यास घेराव घातला होता.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jun 2014 रोजी प्रकाशित
शेत-रस्त्याच्या वादातून नगाव येथे तरुणाची हत्या
शेत-रस्त्याच्या वादातून समाधान निंबा शेवाळे (२८) या तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना येथून जवळच असलेल्या नगाव येथे घडली. तालुका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून एकास अटक केली
First published on: 15-06-2014 at 02:22 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth killed in malegaon