पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील झाई आश्रम शाळेतील सात वर्षीय मुलीला झिका विषाणूची लागण झाली आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेच्या अहवालात हे स्पष्ट झाले आहे. जुलै २०२१ मध्ये पुणे जिल्ह्यात राज्यातील पहिला झिका रुग्ण आढळला होता. या अनुषंगाने पालघर येथे सर्वेक्षण, कीटक व्यवस्थापन उपचार आणि आरोग्य शिक्षण अशा प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. झिकाचा हा राज्यातील दुसरा रुग्ण आहे.

झाई आश्रमशाळेमध्ये शनिवारी दहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. यानंतर या शाळेतील विद्यार्थिनीची तपासणी केली असता १५ विद्यार्थिनींना अंगदुखी, डोकेदुखी, ताप ही लक्षणे आढळून आली. त्यामुळे या विद्यार्थिनींना शनिवारी सायंकाळी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या विद्यार्थिनींचे नमुने एनआयव्हीला तपासणीसाठी पाठविले. यामध्ये एका मुलीला झिकाची लागण झाल्याचे आढळले आहे, तर अन्य सहा विद्यार्थिनींना स्वाईन फ्लूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असून सात दिवस त्यांना देखरेखीसाठी रुग्णालयात ठेवले जाईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय बोदाडे यांनी दिली.

जुलै २०२१ मध्ये पुणे जिल्ह्यात राज्यातील पहिला झिका रुग्ण आढळला होता.

हेही वाचा : Zika Virus म्हणजे काय आणि तो कसा पसरतो? जाणून घ्या लक्षणे आणि बचावाची कारणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालघर येथे सर्वेक्षण, कीटक व्यवस्थापन उपचार आणि आरोग्य शिक्षण अशा प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.