23 April 2018

News Flash

धर्मातिरेकातून विनाशाकडे

जुन्या इतिहासात न शिरता, आपण फक्त विसाव्या शतकापासून घडलेल्या महत्त्वाच्या घटनांवर नजर टाकू या.

सर्व धर्म व त्यांच्यातील सर्व पंथ हे वेगवेगळ्या काळी, वेगवेगळ्या परिस्थितीत व परंपरेत निर्माण झालेले असल्यामुळे त्यांच्यात दर एका साम्याबरोबर पाचदहा लहानमोठय़ा बाबतीत ‘वेगळेपण’ असते.

धर्मतत्त्वे आणि धर्मशिक्षणांतून ‘स्वधर्माभिमान’, त्यातून इतर धर्मपंथीयांचा दुष्टावा हा ‘धर्मातिरेक’ व त्यातून ‘भयानक हिंसा’ अशी अलिखित साखळी आहे. चालू शतकात तर ही साखळी विविध मूलतत्त्ववादी, असहिष्णू संघटनांच्या बळांवर मोठाच वेग घेत आहे. हे दुष्टचक्र आपण कुठेतरी थांबविले पाहिजे..
मानवजात उत्क्रांत होऊन विजयाच्या दिशेने काही टप्पे चालली खरी, परंतु अलीकडच्या काळात तिने ‘विनाशकारी अतिरेकांच्या काही घोडचुका’ केलेल्या असून, त्यातील पहिला अतिरेक, ‘लोकसंख्या वाढीचा’ आहे. हे आपण गेल्या सोमवारच्या ‘पोरांची लेंढारे’ या लेखात पाहिले. आता या लेखात मानवजातीने स्वत:च चांगल्या हेतूंनी निर्माण केलेले विविध धर्म, तिची कशी दिशाभूल करीत आहेत आणि तिला कसे विनाशाकडे नेत आहेत, ते आपण पाहणार आहोत. तसे जगभरातील सर्वच लहानमोठय़ा धर्मपंथातील अनेक श्रद्धा व अंधश्रद्धा, माणसांची सतत दिशाभूल करीत आल्या व अजूनही करीत आहेत. याचे आपल्या देशांतील उदाहरण हे की पूर्वी यज्ञ, मंत्रपठण व नंतर गुरूंचे अंगारे, गंडेदोरे वगैरे धार्मिक उपायांनी फसून त्यात आनंद मानणारी माणसे आधुनिक काळात अंगारे व गंडेदोऱ्यांबरोबरच श्रीयंत्रे, कवचे, सुरक्षाकवचे, एकमुखी रुद्राक्ष, पंचमुखी रुद्राक्ष, भविष्य कथन, वास्तुशास्त्र, फेंग शुई, रेकी, अमूल्य रत्ने, पिरॅमिडची पॉझिटिव्ह एनर्जी अशा जाहिरातीय, वैयक्तिक, मूर्ख उपायांसाठी आपला कष्टाचा पैसा खर्च करणारी माणसे स्वत:ला धार्मिक समजून, वेळेचा अपव्यय व स्वत:ची दिशाभूल करून घेत आहेत.
सर्व धर्म व त्यांच्यातील सर्व पंथ हे वेगवेगळ्या काळी, वेगवेगळ्या परिस्थितीत व परंपरेत निर्माण झालेले असल्यामुळे त्यांच्यात दर एका साम्याबरोबर पाचदहा लहानमोठय़ा बाबतीत ‘वेगळेपण’ असते. त्यामुळे प्रत्येक धर्म, पंथ एकूण ‘वेगळाच’ ठरतो. शिवाय धार्मिक लोकांच्या दृष्टीने त्यांचा ‘स्वत:चा धर्म, इतर धर्माहून श्रेष्ठ असतो’ आणि त्याचे वेगळेपण हे धर्माधर्मातील साम्यापेक्षा महत्त्वाचे व वैशिष्टय़पूर्ण असते. वेगळेपणाच्या त्या आधारावरच त्यांच्या मनात स्वधर्माभिमान, पंथाभिमान निर्माण होतो, रुजतो, वाढतो आणि त्याचीच परिणती पुढे दुसऱ्या धर्मपंथाविषयी ‘सामूहिक शत्रुत्वभावना’ निर्माण होण्यात होते. हा प्रस्तुत लेखाचा मुख्य मुद्दा आहे. सर्व धर्म वरकरणी जरी प्रेम, बंधुभाव इत्यादी शिकवतात, तरी त्यांचे अनुयायी मात्र एका धर्माचे लोक दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या जीवावर उठून त्यांच्यावर युद्धे व अत्याचार लादतात. आजपर्यंतच्या ज्ञात मानवी इतिहासात जास्तीत जास्त युद्धे, दंगेधोपे, अत्याचार व रक्तपात, धर्म किंवा पंथ या एकाच कारणाने झालेले आहेत असे दिसते.
जुन्या इतिहासात न शिरता, आपण फक्त विसाव्या शतकापासून घडलेल्या महत्त्वाच्या घटनांवर नजर टाकू या. जागतिक महायुद्धे जरी धर्मावर आधारित नव्हती तरी दुसऱ्या महायुद्धात, ख्रिस्ती धर्माभिमानी हिटलरच्या नाझी सैन्याने, अनेक युरोपीय देशांतील ज्यू धर्मीय नागरिकांना घराघरांतून शोधून पकडून आणून ठार मारले. पूर्वेकडे नजर टाकली तर चीन, जपान, कंबोडिया वगैरे बौद्ध धर्माचा प्रभाव असलेल्या राष्ट्रांनीसुद्धा आक्रमणे, विध्वंस व नागरिकांवरील क्रौर्याची अगणित उदाहरणे नोंदविली आहेत. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी लक्षावधी निष्पाप नागरिकांवर कोसळलेला हिंसेचा आगडोंब हाही केवळ धर्मकारणेच होता. महात्मा गांधींची व इंदिरा गांधींची हत्यासुद्धा धर्मभावनेने झपाटलेल्या लोकांकडून झाल्या व तद्नंतर दिल्लीत हजारो शीख नागरिकांवर झालेला अत्याचारही अर्थातच धर्मभावनांमुळेच झाला. अलीकडेच श्रीलंकेत तामिळ विरुद्ध बौद्ध धर्मीय सिंहली भाषिकांचे यादवी युद्ध होऊन गेले आणि अगदी आजसुद्धा जगभर सगळीकडे तेच चालले आहे. इस्रायल व पॅलेस्टाइनमधला हिंसाचार ही आज दैनंदिन बाब आहे. ज्यूंचे इस्रायल हे राष्ट्र व आजूबाजूची कडवी मुसलमान धर्मीय अरब राष्ट्रे हे दोन धार्मिक गट, एक दुसऱ्यांचा नाश करायला टपून बसलेले आहेत व त्यांच्या संघर्षांत सबंध जगाचा नाश होणार असेल तरी त्यांना त्याची पर्वा नाही.
असे संघर्ष व हिंसाचार दोन वेगवेगळ्या धर्मातच होतात असेही नसून, एकाच धर्माच्या दोन पंथातही तेच घडते. इतिहासात ख्रिस्ती धर्माच्या कॅथॉलिक व प्रोटेस्टंट पंथीयांनी एक दुसऱ्यांच्या कत्तली केलेल्या आहेत. आज ते होत नाही हे खरे. तरी मुसलमान धर्मातील सुन्नी व शिया पंथीय लोक अल्लाच्याच कृपेने एक दुसऱ्यांच्या मशिदित व वस्तीत (भारताव्यतिरिक्त देशात) मोठाले बॉम्बस्फोट घडवीत आहेत. आज इराक, सीरिया, लिबिया वगैरे इस्लामिक देशांत तर धार्मिक यादवीमुळे, नेमके काय घडत आहे ते कळणेही कठीण झाले आहे. तसेच सध्या आफ्रिका खंडातील अनेक देशांतही धर्माधारित अत्याचारांचा कहर चालू आहे. काही महिन्यांपूर्वी नायजेरियन अतिरेक्यानी मुलींच्या एका शाळेतील अडीचशे शाळकरी मुलींना शाळेतून पळवून नेले! शिवाय अरब आणि जगांतील इतर अनेक राष्ट्रांत तालीबान, अल् कायदा, बोको हराम, आयसिस (म्हणजे इस्लामिक स्टेट) वगैरे कट्टर इस्लामधर्मीय, असहिष्णू, मूलतत्त्ववादी (सनातन धर्मीय) संघटना, श्रीमंत अरब राष्ट्रांच्या आर्थिक मदतीने जगभर हिंसाचार घडवून आणण्यासाठी तत्पर आहेतच. एवढेच काय, पण प्रगत पाश्चात्त्य राष्ट्रांतील लोकांचा धर्माभिमानही काही कमी होत आहे, असे दिसत नाही.
सध्या इराक, सीरिया, लिबिया वगैरे राष्ट्रांतील धर्मपंथजन्य हिंसाचारामुळे, आपापले घरदार व सर्वस्व सोडून परागंदा झालेले, बायकापोरांना घेऊन लपतछपत पळत सुटलेले, दशलक्षावधी लोक ‘आश्रयार्थी’ म्हणून तुर्कस्तान व कित्येक युरोपीय राष्ट्रांत शिरून, जिवंत राहण्यासाठी आधार शोधीत आहेत. असे म्हणतात की आजमितीला धर्मपंथच्छल या एकाच कारणाने ‘विस्थापित’ झालेल्या निरपराध नागरिकांची जगभरांतील एकूण संख्या सहा कोटी आहे आणि इतक्या लोकांना आधार मिळाला नाही तर ते ‘अन्नपाण्यावाचून तडफडून मरणार आहेत’. थांबा जरा श्वास घ्या. ही माणसे आणि त्यांची दुर्दैवी बायकापोरे ही आपली कुणी नातेवाईक वगैरे नाहीत हे खरे; पण तरीही ‘मानव’ या नात्याने ते आपले बहीणभाऊ व मुलेबाळे नाहीत का? आता विचार करा की भारतासह जगात अनेक राष्ट्रांत, जिथे जिथे वेगवेगळ्या धर्मपंथाचे लोक एकत्र राहतात, तिथे सगळीकडे, बहुसंख्याकांनी व अल्पसंख्याकांनी एकमेकांना ठार मारायचे ठरविले तर जगभर केवढा हलकल्लोळ माजेल आणि रक्ताच्या नद्या वाहतील. परंतु बहुतेक धर्माभिमानी लोकांना हे कळतच नाही व ते आपापला धर्माभिमान कमी करीतच नाहीत, याला काय करावे?
थोडक्यात असे की ईश्वराने निर्मिलेले असे मानलेले सर्व धर्म मूलत: जरी कितीही चांगल्या हेतूंनी निर्माण झालेले असले आणि प्रत्येकाला स्वत:चा धर्म जरी कितीही श्रेष्ठ वाटत असला, तरीही आपल्या या असल्या धर्माचा जगावरील प्रत्यक्ष परिणाम ‘दहशतवाद आणि अतोनात हिंसाचार’ हाच आहे. धर्मतत्त्वे आणि धर्मशिक्षणांतून ‘स्वधर्माभिमान’, त्यातून इतर धर्मपंथीयांचा दुष्टावा हा ‘धर्मातिरेक’ व त्यातून ‘भयानक हिंसा’ अशीच ही अलिखित साखळी आहे. आणि चालू शतकात तर ही साखळी विविध मूलतत्त्ववादी, असहिष्णू संघटनांच्या बळांवर मोठाच वेग घेत आहे. हे दुष्टचक्र आपण कुठेतरी थांबविले नाही तर काय होईल? मानवी मनात रुजलेल्या व आता वाढत असलेल्या धर्मजन्य असहिष्णुतेचे, दुष्टाव्याचे हे दुष्टचक्र ही एकच बाब जगांतील अब्जावधी माणसांचा नाश व्हायला पुरी पडेल असे वाटते.
बरे, आजकाल धर्मविद्वेषाच्या मदतीला अण्वस्त्रेसुद्धा उपलब्ध आहेत. धर्मवेडय़ा राष्ट्रांकडेही ती आहेत. जगात जर धर्मद्वेषाकारणे मोठे अणुयुद्ध झाले, तर या पृथ्वीवरील संपूर्ण मानवजात नष्ट व्हायला कितीसे दिवस लागतील?
कृपया या माझ्या लेखनाचा असा अर्थ लावू नका की मी वाचकांच्या मनात अनाठायी भीती निर्माण करीत आहे. मी निरीश्वरवादी अवश्य आहे, पण निराशावादी मात्र नाही. एक सामान्य माणूस म्हणून मला अशी आशा आहे की मनुष्यजात, या धर्मपंथसमस्येचा समंजसपणे विचार करील. जगांतील आजचे सर्व धर्मपंथ हे मानवी बुद्धीची फसवणूक आहेत हे समजून घेईल आणि आपापला स्वधर्माभिमान, पंथाभिमान सोडून देईल. निदान कमी करील व मानवधर्म स्वीकारील; आजच्या आधुनिक प्रगत जगाला, सध्याच्या एवढय़ा व अशा धर्माची काही जरुरी नाही आणि ‘धर्म व ईश्वर’ या आपल्या संकल्पनांची ‘सामाजिक उपयुक्तता’ आता संपलेली आहे हे ती समजून घेईल. या जगांतील सबंध मानवजातीचा विध्वंस होण्याची वेळ आली तर कुठल्याही धर्मग्रंथातील ईश्वरअल्ला इथे येऊन तिला वाचविण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे त्यासाठी जे काही करायचे ते आपणच करायचे आहे हे तिला उमगेल व ते ती करील.
गेल्या सोमवारच्या (१४ डिसेंबर) लेखात आपण चर्चिलेला ‘लोकसंख्यातिरेक’ या घोडचुकीचे मूळ कारणसुद्धा ‘धर्म’ हेच आहे. कारण सगळे धार्मिक लोक ‘मुले ही देवाची देणगी मानतात.’ भारतीय लोकांना तर मृत्यूनंतर स्वर्गमोक्ष मिळावा म्हणून ‘मुलानेच’ प्रेताला अग्नी देणे जरूर असते. अशा या हानीकारक धार्मिक कल्पना सोडून, मानवजातीने विवेकाच्या साहाय्याने जगभर गंभीरतेने ‘लोकसंख्या नियोजन’ करून ‘लोकसंख्येचा विस्फोट’ रोखणे आणि निरीश्वरवाद व मानवधर्म स्वीकारणे आवश्यक आहे.

 

First Published on December 21, 2015 1:12 am

Web Title: article on terrorism
टॅग Terrorism
 1. V
  vijay
  Dec 24, 2015 at 8:17 am
  अगदी निरीश्वर्कॅडी मनुष्य सुद्धा एक धर्माचे अनुसरण करत असतो...तो सुद्धा इतर धर्माचा तिरस्कार करतो ...अगदी काही गोष्टी वैज्ञानिक असतील तरीही कारण त्या गोष्टी ईश्वराशी निगडीत असतात किंवा तस्य प्रस्तुत केलेल्या असतात..म्हणून काहीही करा धर्म हा राहणारच कोणत्या न कोणत्या रुपात...देव मन अथवा माणू नका पण या गोष्टी टाळता नाही येणार...प्रत्येक धर्मातील चांगल्या गोष्टी शिकणा आणि रुजवणं हाच एक पर्याय आहे
  Reply
  1. V
   vijay
   Dec 24, 2015 at 7:32 am
   तुम्ही म्हणता तसा मानव धर्म जरी निर्माण झाला तरीही त्याला राष्ट्रीय सीमारेषा असतीलच...जसे अमेरिकन मानव..अरबी मानव ...असिअन मानव...आणि तोच पुढे धर्म होईल...जोपर्यन माणूस अस्तित्वात आहे तोपर्यंत धर्म संकल्पना संपणार नाही....एकाच धर्म असावा विचार आजचा नाहीये, याचा खूप वेळा प्रयत्न पण केला गेलेला आहे..म्हणून ा वाटते प्रत्येक धर्म मधल्या चांगली गोष्टी तेवड्या जास्त शिकवल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून सगळे िष्णू राहतील...
   Reply
   1. नागनाथ विठल
    Dec 23, 2015 at 9:00 am
    " आयुष्यातल्या प्रत्येक समस्येला यथार्थ गीतेत उत्तर दिलेले आहे. सगळे प्रश्न यथार्थ सोडविणारा धर्मग्रंथ आपण आयुष्यभर वाचत नाहीं. जेव्हा आपण आपल्या वास्तूत ' समस्या ' होऊन बसतो. तेव्हा आपण हा ग्रंथ हातात घेतो. श्री कृष्णाने अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त. केले, ती कथा आपण म्हातारपणी वाचायला घेतो. "
    Reply
    1. नागनाथ विठल
     Dec 23, 2015 at 9:00 am
     लेखक महाशय , परमात्मा आणि प्रकृतीमध्ये एक सीमारेषा आहे .जोपर्यंत प्रकृतीचा प्रभाव अधिकतम असतो, तो पर्यंत माया प्रेरणा देत असते. पण जेव्हा साधक साधनेने मायेच्या प्रभावातून मुक्त होऊन सद्गुरूंच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करतो तेव्हा सद्गुरु वा इष्टदेव काहीही म्हटले तरी प्रेरक भगवंतच आहे हृदयाचा ' स्वामी ' होऊन आत्म्याला जागृत करून भक्ताला स्वत: मार्गदर्शन करतो . ( यथार्थ गीता : १ १ / ३४ ) " आयुष्यातल्या प्रत्येक समस्येला यथार्थ गीतेत उत्तर दिलेले आहे.
     Reply
     1. नागनाथ विठल
      Dec 26, 2015 at 11:51 am
      " झाडावरून पडणारे फळ आपल्याला खाण्यासाठीच पडले आहे. असा विचार केला असता तर कदाचित गुरुत्वाकर्ष्णाचा शोध लागला असता का ? प्रगतीचे मूळ जसे ज्ञानात आहे तसेच ज्ञानाचे मूळ आपल्या विचारात आहे. " माणसाने आपल्या प्रयत्नांची शिकस्त केली तरी त्यास हवे तसे यश मिळण्यास काळाची अनुकुलता लागते.काळ अनुकूल असेल तर थोड्या प्रयत्नाने मोठे फलित पदरात पडते,आणि काळ प्रतिकूल असेल तर प्रचंड प्रयत्नाने हवे तसे फळ मिळत नाही.कालचक्राच्या ह्या बंधानास जी संचालन करते तिला ' नियती ' म्हणतात. आधी प्रयत्न, मग शरणागती आणि मग ग
      Reply
      1. P
       pamar
       Dec 21, 2015 at 11:42 am
       It seems that you are good at misleading people. First of all, no Hindu leader has claimed that Hindu Religion is the best and others need to be converted or killed. Secondly, you have wrongly mentioned that Mahatma hi was killed on religious grounds which is 100% wrong. Nowhere Nathuram has said that he is killing hi as he is Hindu. His reasons & arguments are well known though we may not agree with the same. Kllings based on religion are mainly carried out by Muslims, Christians and bu
       Reply
       1. R
        RJ
        Dec 22, 2015 at 6:13 pm
        मानवजात मनाने उत्क्रांत झालीय की आदिमानवाच्या टोळीयुद्धाच्या काळच्या शस्त्रांच्या जागी अण्वस्त्रे आली , टोळीच्या जागी क्लब्ज आले ? आपल्याकडे असे मानतात की जो पुण्यवान असतो त्याला मोक्ष मिळतो व बाकीचे पुनर्जन्म घेतात . मग आपल्या घरात अशा एखाद्या पापी आत्म्याचा जन्म व्हावा हा अट्टाहास बहुतेक सर्व का धरतात ? मुखी पसायदान असलेल्यांच्या दैनंदिन विश्वात इतर सर्व पण येतात की त्यांचे विश्व फक्त ठराविक लोकांना सामावून घेऊ शकते ?
        Reply
        1. R
         RJ
         Dec 22, 2015 at 6:29 pm
         सर्व धर्मांचे संस्थापक, धर्माशी संबंधित काम करणारे, नियम ठरवणारे मुख्य लोकं हे 'पुरुष' आहेत . भारतात शैव-वैष्णव पंथांत हिंसाचार झाल्याचे कधी ऐकण्यात आले नाही , मात्र सर्व पंथातील स्त्री-जातीवर मात्र अनेक अत्याचार झालेत व होत आहेतच . त्या बाबतीत जगातील व राष्ट्रातील सर्वांचे अगदी 'एकमत ' दिसते ! भारतात अनेक स्त्री-देवतांना पूजले जाते मात्र कोणत्याही देवीची जन्मदिवस/जयंती साजरी होत नाही. ऐकलेय कधी सीतानवमी , गौरीचतुर्थी, लाक्ष्मिजायन्ति , सरस्वती अष्टमी ?
         Reply
         1. V
          vasant
          Dec 23, 2015 at 1:43 am
          बेडेकर हे ब्राम्हण व हिंदू असल्याने असले वांझोटे लेख लिहले आहेत . त्यांनी समाजासाठी जमिनीवर उतरून काम करावे स्वताच्या जातीत काम करावे उगाच केत्क्रांशी ओळख आहे बाकी काय
          Reply
          1. V
           Vinisha Dhamankar
           Dec 23, 2015 at 9:47 am
           बेडेकर सर, प्रस्तुत लेख वाचून मी हि बऱ्यापैकी आश्वस्त आणि आशावादी झाले होते. पण प्रतिक्रिया वाचून पुन्हा निराशेने घेरले आहे. (सुनील यांची प्रतिक्रिया उल्लेखनीय). आपापले धर्म त्यागून किंवा विसर्जित करून मानवधर्म स्वीकारणे नजीकच्या काळात कितीसे शक्य होईल या विषयी शंका वाटते. आपल्या सारखे प्रबोधन होत राहिले तर मात्र पुढील पिढी तरी यावर विचार आणि अं करील असे वाटते. लेखाबद्दल धन्यवाद !
           Reply
           1. Load More Comments